type='font/woff2'/> मोबाईल पाण्यात पडला तर काय करावे ? smart phone tricks and tips 2023 | Water_ Damaged phone, smart watch neck band air pod tips | Rain | Water

मोबाईल पाण्यात पडला तर काय करावे ? smart phone tricks and tips 2023 | Water_ Damaged phone, smart watch neck band air pod tips | Rain | Water

४ भन्नाट टीप ज्यामुळे तुमचा भिजलेला मोबईल घरच्या घरी दुरुस्त होईल | 4 unbeatable to save water damaged Mobile 

 नमस्कार मित्रांनो ,

मित्रांनो आजकाल पाऊस हा बारमाही झाला आहे . आणि आपल्या इथे तर कधी पण पाऊस येऊ शकतो आणि यासाठी आपण नेहमीच तयार असेल असे नाही आणि याचमुळे आपल्यापैकी कितेकांचा मोबाईल  अवेळी आलेल्या पावसात भिजला असेल.बर आता मोबाईल भिजला कि सगळे काम बंद च कि ना कोणाचा फोन येणार , ना कोणाला फोन करता येणार. दुकानात जाऊन रेपीअर करूच कि पण त्या अगोदर अश्या टाईम ला आपण घरच्या घरी काय उपाय करू शकतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुमचा मोबाईल असेल किंवा कोणताही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट असेल ते पावसाच्या पाण्यात भिजलं किंवा या ठिकाणी पाण्यात पडले तर तुम्ही घरच्या घरी त्याला दुरुस्त कशा पद्धतीने करू शकता पण आता हे सध्या जे आहेत ते म्हणजे माझ्यासोबत झाला आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की अरे याच्यावरती एक लेख आपण बनवायला पाहिजे सध्या पावसाळा देखील येतोय आणि पावसाच्या दिवसात अनेक वेळा चान्स असतात ते आपला मोबाईल जो आहे तो पावसात भिजतोच आणि mobile Water_ Damaged होतो  त्यामुळे ते घरीच दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला पहिली टिप्स मी देणार आहे .


टीप १ : बॅटरी काढा | Remove Mobile Battery

जर आपण Keypad चा मोबाईल वापरत असाल आणि  तो जर पाण्यामध्ये भिजला ओला झाला तर सर्वात अगोदर जे काम करायचं ते म्हणजे तर तुम्ही त्याचे बॅटरी काढून टाका. आणि ४-५ तास Switch On करू नका .

आजिबातच मोबाईल चालू (Switch On) करण्याचा प्रयत्न करू नका किंवा घाई करू नका कारण कि जर तुम्ही असे  केल तर मोबाईल मध्ये शोर्ट सर्किट होण्याचा चान्सस असतो आणि आपला जो मोबाईल आहे तो कायमचा निकामी होऊ शकतो.

टीप २ : सीम , मेमोरी कार्ड काढा | Remove sim, memory card

जर तुमच्या जवळ जर स्माट मोबाईल जसे कि Android किंवा iphone असेल तर  त्यांनी काय करायचं आहे तर अगोदर मोबाईल ऑफ करून ठेवयचा आणि सोबतच तुमच्या मोबाईल मध्ये जर का सिम कार्ड निघत असेल मेमरी कार्ड निघत असेल तर ते लगेचच काढून  ठेवायाचे आहे .त्याचा फायदा असा होतो की ते त्या तुमचे सिम कार्ड  आणि मेमरी कार्ड  या ठिकाणी खराब होणार नाही तुमच्या मेमरी कार्ड मध्ये जर काही डेटा असेल तर तो सुरक्षित त्याच्या मुळे राहू शकतो त्यामुळे हे पहिलं काम करायचं म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सिम कार्ड किंवा मेमरी कार्ड असेल ते काढून  ठेवायाचे आहे.

मोबाईल बॅटरी होईल डबल 100% 🔋 🔋 Mobile Battery Saving Tips

टीप ३ :मोबाईल मधले पाणी काढा  | Remove the water from the mobile

तिसरी टीप म्हणजे आता तुम्हाला मोबईल कसा कोरडा करता येईल हे बगायचे आहे . पाणी काढण्यासाठी वरच्या साईड ने आपल्या जे हेडफोन जक असते तेथून तुम्ही त्याला काढू शकता यासोबतच तुम्ही कोरड्या कपड्याने पूर्णपणे त्याला पुसून घ्या आणि एक चुकी या ठिकाणी करायची नाही आपल्याकडे जे हेअर ड्रायरचा उपयोग अनेक जण करतात कशासाठी तर त्याला लगेच सुकवण्यासाठी तो करायचा नाही  कारण कि आत मध्ये जे सॉकेट्स असतात खूप नाजूक असतात आणि त्याला जे आहे त्या ठिकाणी डाग(soldering) दिलेल्या असतात.जर तुम्ही हाय प्रेशर ने त्याच्यावरती जर का युज केला तर ते जे पार्ट आहे ते गरम होतील आणि ते खराब होण्याचा चान्स असतो त्यामुळे तुम्ही नॅचरली थोडं फार त्याला ठेवू शकता उन्हात वगैरे एक दहा पंधरा मिनिटांसाठी उन्हात ठेवू शकता तर पण ते डायरेक्टली हेवी प्रेशर देऊन जे आहेत तुम्ही त्याला अजिबात सुकू नका.

टीप ४ : मोबाईल कोरडा करा |Dry your mobile

चौथी टीप आहे  जी गोष्ट आहे मित्रांनो आपल्या घरात असलेले साधे जे तांदूळ असतात त्याचा उपयोग आता आपण याच्यासाठी करायचा आहे आणि तांदुळाच्या डब्यात आपल्या मोबाईलला नॉर्मल कपडा घ्यायचाय आणि त्याच्यामध्ये त्याला टाकायचं किंवा गुंडाळून ठेवायचे आणि तो जो मोबाईल आहे किंवा तो जो गॅजेट आहे कोणताही त्याला तांदुळाच्या डब्यात पूर्णपणे आत मध्ये टाकून द्यायचं किमान 12:00 तास तुम्हाला अजिबात मोबाईलला हात लावयचा नाही आहे किंवा चालू करायचं नाहीये . मोबाईल आत मध्ये ठेवून दिल्याच्या नंतर तांदूळ काय करतात तांदूळ सगळ्यात जास्त dryness आहे ते  मोबाईल मधेले पाणी कोरडे करून टाकते . त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल वापरू शकता .

हे उपाय वापरून तुम्ही तुमचा पाण्यात भिजलेला मोबाईल घरीच दुरूस्त करू शकता. जर तुम्ही केला नाही आणि त्यानंतर तुमचा मोबाईल चा मदर बोर्ड खराब किंवा बाकी चे पार्ट जे आहेत ते खराब होऊ शकतात.या ज्या काही मी साध्या सिम्पल टिप्स दिल्या आहेत . वर्षभर पावसाळ्याचे दिवस चलूच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो शकतो. त्यामुळे ही जे टिप्स मी तुम्हाला सांगितल्या त्या मोबाईल असेल किंवा तुमचे इतर गॅजेट्स जसे कि Smart watch , Neck band, Air pod अश्या  इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स सगळ्यांच्या बाबतीत लागू पडतात . तुम्हाला जर ह्या टीप आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा .

धन्यवाद.

खाली लेख वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने