type='font/woff2'/> एकच व्हाट्सअप नंबर आपल्या अनेक फोनवर वापरता येणार.व्हाट्सअप ची आनंदाची बातमी सुरू कसं करायचं? जुना व्हाट्सअप नंबर वापरा Whats App update 2023|one whats app multiple phone

एकच व्हाट्सअप नंबर आपल्या अनेक फोनवर वापरता येणार.व्हाट्सअप ची आनंदाची बातमी सुरू कसं करायचं? जुना व्हाट्सअप नंबर वापरा Whats App update 2023|one whats app multiple phone

 मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी हे अपडेट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे जुना व्हाट्सअप नंबर वापरा 

खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी व्हाट्सअप ने त्यांचे नवीन अपडेट लॉन्च केले आहे आपण सर्वजणच व्हाट्सअप वापरतो त्याचा वापर करून आपण आपल्या प्रियजनांना सोबत मेसेज करून विविध गोष्टींची माहिती देत असतो किंवा त्यांच्याकडून माहिती जाणून घेत असतो . तसेच भरपूर छोटे व्यापार हे व्हाट्सअपच्या मदतीने त्यांचा व्यवसाय वाढवत आहेत. व्हाट्सअप हे जगभरात प्रसिद्ध आहे .



मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी हे अपडेट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तर आता या नवीन अपडेट नुसार तुम्ही एक मोबाईल वरती चालणारे अकाउंट चार मोबाईलवर वापरू शकतात (Multi-Device Support).

या अगोदर एकच अकाउंट एक फोन मध्ये आणि Whats App Web , Whats App Desktop च्या मदतीने  आपल्या लॅपटॉप वर वापरता येत होते पण ते वापरताना आपल्याला आपला जो मोबाईल आहे तो कायम सोबत ठेवावा लागत होता पण आता या नवीन अपडेट नुसार तुम्हाला मोबाईल जवळ ठेवण्याची गरज नाही.हे नवीन अपडेट काही आठवड्यांमध्ये प्ले स्टोअर वर उपलब्ध होईल. तर या अगोदर मेटा कंपनी हे फीचर 2021 पासून व्हाट्सअप च्या बीटा व्हर्जन व टेस्ट करत आहेत.

या अपडेटच्या मदतीने वापरकरते त्यांचे मेसेज आणि चॅट सर्व डिवाइस वर जवळपास एक वर्षापर्यंत सिंक करू शकतात. End to end encryption त्यामुळे  हे व्हाट्सअप चे अपडेट एकदम सुरक्षित आहे असे सांगण्यात येत आहे.

मेटा कंपनीने व्यवसायिकासाठी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि सोबतच जे वापरकरते एकापेक्षा जास्त फोनचा वापर करतात त्या युजरसाठीही हा नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

Mobile Banking Virus : सावध व्हा ! नवीन मोबाईल बँकिंग व्हायरसचा भारतात कहर .... काही मिनिटांत बँक खाते रिकामे होईल का ? SOHO virus ? fake banking app

तर हे नवीन व्हाट्सअप आपण दुसरा फोन मध्ये कसे इंस्टॉल करू शकतो ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

हे करताना आपण आपला पहिला फोन (Primary Phone)असं गृहीत धरू आणि जे दुसरे तिसरे चौथा फोन असेल ते (Secondary Phone) असे समजून स्टेप्स फॉलो करू.

१. सुरुवातीला जे नवीन फोन आहे त्यामध्ये आपल्याला व्हाट्सअप चे नवीन अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल  म्हणजे व्हाट्सअप डाउनलोड    करून घ्यायचे आहे.
२. इन्स्टॉल केल्याच्यानंतर व्हाट्सअप ओपन करून उजव्या कोपऱ्यावर असलेल्या मोर (More)ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
३. त्यानंतर Link to existing account ह्या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
४. आता तुम्हाला स्क्रीनवर एक QR कोड दिसेल जो की आपल्याला सुरुवातीचा फोन (Primary Phone) आहे त्यामध्ये स्कॅन करायचा     आहे.
५. ते QR कोड स्कॅन करण्यासाठी आपल्या प्रायमरी फोन मध्ये व्हाट्सअप ओपन करा .
६. त्यामध्ये More Options >Linked Devices >Link a device वर क्लिक करा.
७. कॅमेरा ओपन झाल्यानंतर त्याद्वारे नव्या किंवा दुसऱ्या फोनच्या स्क्रीनवर दिसत असलेला QR  कोड स्कॅन करा.
८. आता तुमचे प्रायमरी अकाउंट हे तुमच्या दुसऱ्या फोन मध्ये चालू झालेले दिसत असेल, सर्व मेसेज सिंक होईपर्यंत वाट बघा.

व्हाट्सअप चे नवीन अपडेट वापरण्या अगोदर खालील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे.

  • तुम्ही तुमचे आयफोन व अँड्रॉइड असे दोन्ही प्रकारचे फोन्स एकमेकांसोबत लिंक करू शकतात.
  • किमान एक वर्षापर्यंतची चॅट हिस्टरी त्यामध्ये तुमचे फोटोज मेसेजेस व्हिडिओज हे सिंक होतील.
  • व्हाट्सअप च्या  अपडेट मध्ये जसे की लाईव्ह लोकेशन, स्टेटस अपडेट या हे पर्याय दुसऱ्या फोन मध्ये म्हणजे सेकंडरी फोन मध्ये तुम्हाला वापरता येणार नाहीत.
  • जर तुमचा सुरुवातीचा फोन म्हणजे प्रायमरी फोन मध्ये जुना व्हाट्सअप नंबर जर तुम्ही 14 दिवस जर व्हाट्सअप वापरले नाही तर तुमचे इतर मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलेले व्हाट्सअप हे ऑटोमॅटिक लॉग आऊट होईल.
  • वरील स्टेप्स वापरून तुम्ही पुन्हा लॉग आऊट झालेले फोन मधील लॉगिन करू शकता.
  • आपला एक नंबर किती फोन मध्ये लॉगिन केलेला आहे हे बघण्यासाठी Settings > linked devices .

 


टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने