type='font/woff2'/> FASTag ने टोल कसा भरला जातो| बँक अकाऊंट पैसे कसे कट होतात | How FASTag Works |How Toll got deduct from Bank account FASTag recharge

FASTag ने टोल कसा भरला जातो| बँक अकाऊंट पैसे कसे कट होतात | How FASTag Works |How Toll got deduct from Bank account FASTag recharge


नमस्कार मित्रांनो,

महामार्गावरून प्रवास करत असताना तुम्ही भरपूर वेळा फास्टट्रॅक द्वारे तुमच्या वाहनाचा टोल भरला असेल पण तुम्ही कधी विचार केला आहे का FASTag द्वारे तुमच्या खात्यातून पैसे टोल साठी कसे वापरले जातात. चला तर मित्रांनो आजच्या लेखांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हे FASTag कसे काम करते.



नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया ने सर्व वाहनांसाठी FASTag सेवा 1  डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात आली आहे .

कोणत्याही वाहनाला FASTag जर नसेल तर चालकाला टोल नाक्यावर दुप्पट कर भरावा लागू शकतो. टोल नाक्यावरून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी FASTag  चा वापर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बंधनकारक केला होता.

·      FASTag म्हणजे काय ?  What is FASTag  ?

हा FASTag एखादा  स्टिकर सारखा आहे पण हे आहे डिजिटल स्टिकर. या स्टिकर मध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीचा (RFID – Radio Freqvency Identity) वापर केला जातो.

    त्यामध्ये तुमच्या वाहनाची आणि बँक खात्याची संक्षिप्त सोबत त्यामध्ये माहिती असते, FASTag जो की आपल्या कारच्या पुढच्या काचेवर लावावा लागतो ज्यामुळे तो सहज सहजी scan होऊ शकेल.

RFID चे आणखी उदहारणे जाणून घेण्यासठी मला comment करून कळवा.

 

·      फास्ट कसे काम करते ? बँक अकाउंट मधून कसा टोल भरला जातो. How FASTag works

तुमची वाहन टोल नाक्यावरून क्रॉस होताना FASTag  मध्ये जोडलेल्या प्रीपेड अकाउंट किंवा बँक अकाउंट मधून तुमचा कर भरला जातो, तर ही सगळी प्रक्रिया कशी होते ते आपण जाणून घेऊया.
काचेवर लावलेल्या स्टिकर मध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन असते यालाच आर एफ आय डी असे म्हणतात .

RFID मध्ये माहिती साठवण्याची क्षमता (Data Storage Capacity) असते .

o   वाहनाचा मालकाची माहिती

o   वाहनाची माहिती ( RTO Number, Chassis Number, Vahical type )

o   बँक अकाउंटची माहिती इत्यादी




हे वाचा : मोबाईल पाण्यात पडला तर काय करावे ? smart phone tricks and tips 2023

आणि हि माहिती तांत्रिक स्वरूपामध्ये FASTag मध्ये साठवलेली असते . जसे आपण माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी भाषा वापरतो , आपण मराठी मध्ये बोलू शकतो आणि समजू शकतो शकतो , त्याचप्रमाणे संगणकाची ( computer ) ची संगणकीय/तांत्रिक भाषा  ( machine language ) असते . जेव्हा आपले वाहन टोल नाक्यावर  उभे असताना FASTag scan होता आणि संगणकीय/तांत्रिक भाषाच्या स्वरूपातली वाहनाची माहिती संगणकापर्यंत जाते .संगणक त्या माहितीवर प्रक्रिया करून आपल्या बँकेला तुमच्या अकाउंट मधून टोल भरण्यासाठी विनंती करतो . नंतर बँक अकाउंटची KYC स्थिती बघून तुमच्या अकाउंटमधून पैसे टोल अथोरिटी (NETC) ला पाठवते .

एकदा की तुमचा टोल भरला गेला तर याची माहिती तुम्हाला एसएमएस द्वारे त्वरित समजते. ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी काही सेकंदांचा वेळ लागतो.



·       FASTag कुठे आणि कसा खरेदी करायचा How to buy FASTag
FASTag
कोणत्याही टोलनाक्याच्या नजदीक तुम्हाला उपलब्ध होईल किंवा बँका जसे की SBI ,HDFC ,ICICI, AXIS bank इत्यादी अशा भरपूर बँकांमध्ये जाऊन तुम्ही FASTag खरेदी करू शकता तसेच ऑनलाइन प्लीकेशन PayTm,Amazon इत्यादी ठिकाणावरील तुम्ही फास्ट खरेदी करू शकतात.

·       FASTag साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
आपल्या वाहनासाठी FASTag काढण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असतात,

  • o ग्राहकाचे वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे RC Book
  • o   वाहन मालकाचे बँक KYC कागदपत्रे
  • o   वाहन मालकाच्या ओळखपत्र – Aadhar Card, Pan Card,Voter Id.

  • एकदा काढलेले फास्ट 5 वर्षे वैधता असते.

·      FASTag रिचार्ज कसा करावा. How to Recharge FASTag


जेव्हाही आपल्या फास्ट अकाउंट मधील रक्कम संपते तेव्हा आपल्याला रिचार्ज करावा लागतो FASTag ची रिचार्ज करणे हे मोबाईल रिचार्ज करण्यासारखे सोपी आणि सरळ आहे.

तुम्ही फास्ट रिचार्ज तुमचा जवळील ग्राहक सेवा केंद्र मध्ये बँकेमध्ये जाऊन करू शकतात.

तसेच मोबाईल वरून UPI, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड च्या मदतीने FASTag रिचार्ज करता

FASTag  मध्ये आपण कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंत रिचार्ज करू शकतो.

 PhonePe रून FASTag ची ऑनलाईन रिचार्ज करणे खूप सोपे आहे.



फास्टट्रॅक मधील बॅलन्स चेक करणे साठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने मिस कॉल अलर्ट सेवा सुरू केली आहे

+91 8884333331 ह्या नंबर वर मिस कॉल देऊन FASTag मधील बॅलन्स आपण चेक करू शकतो.

तसेच आपण My FASTag App इंस्टाल करून आपला FASTag च्या बॅलन्स ची तपासू शकतात.


हे वाचा : मोबाईल बॅटरी होईल डबल 100% 🔋 🔋 Mobile Battery Saving Tips

·      FASTag चे फायदे  Benifites of FASTag

o   फास्टट्रॅक मुळे होणार सगळ्यात मोठा फायदा म्हणजे टोल नाक्यावरती गाड्यांना थांबता टोल नाका पार कर येतो यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो  आणि गाड्या च्या धुराचे प्रदूषण काहीसे कमी होण्यास मदत होईल.

o   याशिवाय FASTag मुळे सर्व गाड्या सरकारी रेकॉर्डमध्ये वर येतील जेणेकरून आपल्या गरज भासल्यास एखादी गाडी ट्रॅक करणेही सोपी होईल.

o   याशिवाय आपण आपल्याला वाहन खर्चाचा आढावा घेणे सोपे जाईल कारण टोल डिजिटल पद्धतीने भरल्याने त्याचा तपशील अकाउंट स्टेटमेंट मध्ये मिळेल.

यावतिरिक्त आपल्याला जर खालील मुद्यांची माहिती करून घेण्यासाठी मला comment मध्ये कळवा.

FASTag recharge by Vehicle Number

Online FASTAG recharge

Transfer FASTag 

How to get fastag immediately

How to deactivate fastag online 

How to get fastag in a day









टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने