EVMबाबत मतदारांमध्ये नेहमी कुतूहल तर विरोधकांमध्ये नेहमी संशयच राहिला आहे. पण खरंच EVM हॅक होऊ शकतात का? Full form EVM 2024 Election
नमस्कार मित्रांनो,
काही दिवसांमध्ये निवडणुकीचा
बिगुल वाजणार आहे. निवडणूक पंतप्रधान पदाची असो वा ग्रामपंचायतीची निवडणूक असो आपल्या देशात एकदम पूरक वातावरण असते . निवडणूक आयोगाने मतदान
तारखांची घोषणा केल्यानंतर हजारो
उमेदवारांच्या भविष्याला फैसला होणार असतो ते सुद्धा एक बटन दाबून म्हणजेच EVM मशिन वापरून . निवडणुकीच्या रणधुमाळीवेळी
EVM चा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. ईव्हीएम हॅकिंगचे अनेक आरोप (EVM Hack) आतापर्यंत विरोधी पक्षांकडून लावण्यात आले आहेत.
जर तुम्ही पहिल्यांदाच मतदाण करणार असाल, तर तुम्हाला कदाचित या मशीन्सबद्दल उत्सुकता असेल. तसेच अनुभवी मतदारासाठीही, ईव्हीएम मशिन च्या तंत्रज्ञान आणि कार्यपद्धत काय आहे हे जाणून घेण्याच कुतूहल नक्कीच असते .
नेमकं EVM म्हणजे काय आणि त्या संदर्भातील रंजकदार माहिती आपण वाचणार आहे.
EVM म्हणजे काय What is EVM full form
ईव्हीएम’ अर्थातच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन. पारपंरिक मतपेट्यांची पद्धत कालबाह्य होऊन मतदान आणि मतमोजणीसाठी
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) या आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करण्यात येतो.
‘EVM’चे मुख्यत्वे बॅलेट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU ), व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन (VVPAT) असे तीन भाग असतात.
EVM कसे काम करते ? Working of EVM ?
- बॅलेट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU ), व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन (VVPAT) हे तिन्ही एकमेकांला केबलद्वारे जोडलेले असतात.
- लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे इथे कुठलेच रेमोट , एंटेना किंवा इंटरनेट कनेक्शन नसते थोडक्यात बाहेरील दुनियेशी या मशिनचा संबंध नसतो .
- जेव्हा तुम्ही बॅलेट युनिट (BU) समोर जाऊन उभे राहता तेव्हा मतदान कक्ष अधिकारी कंट्रोल युनिट (CU ) च्या साछाय्याने बॅलेट युनिट चालू करतो आणि तुम्हाला तुमच्या आवडत्या उमेदवाराच्या नावासामोरील बटन दाबून मतदान करता येते .
- त्यानंतर VVPAT मध्ये तुम्ही मतदान केलेल्या
उमेदवाराचे चिन्ह नाव प्रिंट होते ते बगून तुम्ही खात्री करू शकतात कि तुम्ही
दाबलेल्या बटन आणि प्रिंट दोन्हींमध्ये साम्य आहे .
EVM मशीनचे काही प्रमुख वैशिष्टे
- EVM मशिन हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे हि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे . EVM मशिन हे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL )आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन भारत सरकारच्या कंपन्यानमध्ये बनवले जाते.
- विजेचा प्रचंड तुटवडा क्किंवा दुर्गम भागांमधील मतदार केंद्रांच्या समस्येवर मात करण्यासाठी EVM सामान्यत: ६v अल्कलीन बॅटरीवर चालतात.
- नवीन एम 3 ईव्हीएम मशीनमध्ये एक कंट्रोल युनिट (CU) ज्याद्वारे 24 बॅलेट युनिट (BU) ची एकत्रित जोडणी करून 384 उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया राबविली जाऊ शकते.
- NOTA (वरीलपैकी काहीही नाही) देखील उमेदवारांच्या यादीमध्ये एक पर्याय म्हणून गणले जाते. NOTA मतदारांना त्यांचे मत कोणत्याही पक्षाच्या बाजूने न नोंदवण्याची परवानगी देते.
- EVM मधील मते 10 वर्षांपर्यंत जतन करून ठेवता येतात. परंतु सहसा मतमोजणी हि मतदानाच्या दिवसाच्या जास्तीत जास्त एक महिना नंतर केली जाते.
- मतदान संपल्यानंतर, ईव्हीएममधील मतदान संख्या मतदान केंद्रावर मोजली जाते . त्यानंतर मतमोजणीच्या दिवसापर्यंत ईव्हीएम सुरक्षेसह नियुक्त वॉर्ड कार्यालयात ठेवले जातात.
- कंट्रोल युनिटच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा प्रोग्राम हा एका मायक्रो चिपमध्ये “एक वेळ प्रोग्राम करण्यायोग्य आधारावर” (one time writable ) सेव केला जातो. एकदा सेव केलाला प्रोग्राम किंवा कोड वाचता येत नाही , कॉपी पण करता येत नाही आणि बदलता हि येत नाही.
VVPAT चा परिचय (वोटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल)
- VVPAT मतदारांना त्यांनी केलेल्या निवडीची प्रत्यक्ष खात्री करण्यास मदत करते. यात एक प्रिंटर असतो जो मत निवडीचे स्लीप देतो.
- मतदार जेव्हा ईव्हीएमवर मतदान करतो.EVM ला जोडलेले प्रिंटर सारखी व्हीव्हीपीएटी उपकरण ज्या उमेदवाराला मतदान केले होते त्याचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह दर्शविणारी स्लिप तयार करते. या स्लिपद्वारे मतदाराला त्याच्या मताची पडताळणी करता येईल.
- ऑगस्ट 2013 मध्ये (vvpat first used in india )निवडणूक नियमांमध्ये सुधारणा करून आणि मतदान अधिक पारदर्शी करण्यासाठी प्रथमच VVPAT लागू करण्यात आला. त्यानंतर, राज्य विधानसभांच्या प्रत्येक निवडणुकीत निवडक मतदारसंघांमध्ये VVPAT चा वापर करण्यात आला.