type='font/woff2'/> Power BI काय आहे Power BI करिअरच्या संधी आणि सरासरी पगार काय आहेत ? What is Microsoft Power BI and Career Opportunities in Power BI in 2023

Power BI काय आहे Power BI करिअरच्या संधी आणि सरासरी पगार काय आहेत ? What is Microsoft Power BI and Career Opportunities in Power BI in 2023

 जर तुम्हाला मोठ्या  MNC कंपन्यांमध्ये काम करायचे असेल, तर Power BI मध्ये करिअर हा एक  उत्तम पर्याय आहे / Power BI information in Marathiतुम्ही Power BI टूलमध्ये करिअर बनवण्यास उत्सुक आहात का? किंवा तुम्हाला याविषयी माहिती पाहिजे आहे का ? जर हो! मग हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे.
या लेखात आपण ,
Power BI काय आहे ? 
Power BI मध्ये करिअर चे भविष्य आणि मागणी.
Power BI करिअरच्या संधी कोणत्या कंपनी मध्ये आहेत?
Power BI मध्ये काम करताना सरासरी पगार काय आहेत ? आणि आणखी भरपूर मुद्यांवर चर्चा करणार आहोत.
त्यामुळे Power BI वरील हा लेख पूर्ण वाचा आणि शेअर करा .

Power BI काय आहे ? What is Power BI and Why is it Important ?

 • Power BI (Business intelligence) हे Microsoft चे टूल आहे जे कि खूप सगळ्या प्रोसेस , आर्किटेक्चर आणि तंत्रज्ञानाचा संग्रह आहे.
 • जो कि रॉ डेटाचे एकत्रितकरण , विश्लेषण करून त्याचे रूपांतर अर्थपूर्ण आणि माहितीपूर्ण सामग्रीमध्ये करतो. त्यामुळे तो डेटा कुणालाही सहजपणे समजू शकते.आणि त्या माहितीच्या आधारे कंपनीच्या हिताचे निर्णय घेण्यास मदत होते.
 • Microsoft ने हे टूल अगदी युजर फ्रेंडली बनवलेले आहे , ज्याला MS Excel चे थोडेफार ज्ञान आहे त्याला हे टूल एकदा कोर्स करून सहज शिकता येईल .
 • Microsoft च्या वेबसाईट वरून  Power BI Desktop हे  अप्प्लीकेशन आपण डाऊनलोड करू शकतो.
 • Power BI हे अंदाज लावण्यापेक्षा  facts based and logic च्या आधारावर निर्णय घेण्यासाठी मदतीचे ठरते . 
याचमुळे खूप कंपन्यामध्ये ह्या टूल चा उपयोग वाढत आहे . आणि त्यामुळे Power BI मधील मधील करिअर च्या संधी देखील वाढल्या आहेत.

Power BI सारखे इतर BI टूल्स : Tableau, Looker, Qlik 

Power BI मध्ये करिअर / Career Opportunities in Power BI

 • आज मार्केट मध्ये खूप सारे BI टूल्स आहेत पण Naukari.com च्या एका सर्वे नुसार २०२० नंतर Power BI ची मागणी सर्वात जास्त झाली आहे . जवळ जवळ १८ हजार पेक्ष्या जास्त कंपन्यांमध्ये Power BI वापरले जाते .
 • वरती सांगितल्याप्रमाणे  , Business intelligence मुळे  कंपन्यांची योग्य  निर्णय घेण्याच्या क्षमते मध्ये वाढ होते  तसेच त्यांना कंपन्यांसाठी भविष्यातील सर्वोत्तम संधी ओळखण्याची क्षमता वाढवतो .
 •  सर्व BI टूल्स मध्ये , Power BI हे  आघाडीवर आहे. आज, बहुतेक MNC आणि मोठ्या कंपन्यांमध्ये Power BI-certified लोकांना खूप मागणी आहे.
 • Power BI मध्ये नोकऱ्या तुम्हाला खूप चांगला  पगार देतात आणि तुम्हाला टॉप MNC कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी देतात.

Power BI शिकणे सोपे आहे का....?

 • Power BI शिकणे खूपच सोपे आहे परंतु काही प्रकारचे integrations आणि data lakes हाताळणे थोडे कठीण आहे. 
 • ते अधिक सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी तुम्ही कोणत्याही Power BI प्रशिक्षण/कोर्स घेऊ शकता. तसेच, कोर्स  ची निवड करताना सध्या च्या  उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमाची रचना तपासून पहावी .
 • मायक्रोसॉफ्ट वर खालील Power BI platforms उपलब्ध आहेत  /Microsoft offers three types of Power BI platforms
  1. Power BI Desktop (Desktop Application)
  2. Power BI Service (SaaS i.e. Software as a Service)
  3. Power BI Mobile (for iOS and Android devices)
 • तसेच Power BI मध्ये अनेक घटक समाविष्ट आहेत जे आपल्याला डेटा अहवाल (report) तयार करण्यात आणि शेअर करण्यात मदत करतात. त्या खालीलप्रमाणे आहेत.
  1. Power Query: a data mashup and transformation tool
  2. Power Pivot: a memory tabular data modeling tool
  3. Power View: a data visualization tool
  4. Power Map: a 3D geospatial data visualization tool
  5. Power Q&A: a natural language question and answering engine

Power BI हा करिअरचा चांगला पर्याय आहे का?

 • उद्योगांची , व्यावसायांची ध्येय धोरणे हि पूर्णपणे माहितीच्या आधारवर अवलंबून असतात . ह्याच माहितीची रिअल-टाइम आणि अर्थपूर्ण मांडणी बघता यावी  यासाठी सगळ्या कंपन्या तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत .
 • त्यातल्या त्यात Power BI हे खूप लोकप्रिय टूल आहे जे कि वेळोवेळी उद्योगांच्या मागणीनुसार त्यांचे टूल अपडेट करते आणि तसेच वापरायला देखील सोपे आहे.
 • Power BI चा डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणून वापर करणारे मुख्य उद्योग हे सॉफ्टवेअर किंवा IT कंपन्यांसोबत , हॉटेल उद्योग, वित्तीय उद्योग (financial industry), व्यवस्थापन सल्ला सेवा (management consulting services), किरकोळ क्षेत्रे, कर्मचारी आणि भरती उद्योग (staffing & recruitment industry)आहेत. 
म्हणून, बहुतेक सुप्रसिद्ध उद्योग डेटा व्हिज्युअलायझेशन साधन म्हणून Power BI चा वापर करतात.

Power BI मध्ये काम करतानाच्या जबाबदारी आणि कर्तव्ये :

 • Power BI मध्ये काम करताना अवाढव्य आणि किचकट डेटाचे तपशीलवार सोप्या पध्दतीने सारांश म्हणजे Summary तयार करणे हि  एक मुख्य जबाबदारी असते .कारण ते बघून कोणतेही मोठे निर्णय किंवा भविष्यातले अंदाज लावले जातात .
 • प्रत्येक सेकंदाला जमा होणारा डेटाचे व्यवस्थित आणि सोप्या पध्दतीने मांडून ठेवणे हे कर्तव्ये Power BI मध्ये काम करताना करावे लागते .

Power BI मध्ये Pro होण्यासाठी आवश्यक स्किल्स / Important Skills to Become a Power BI Professional

Power BI मधील करिअरच्या संधी बघितल्यानंतर , Power BI मध्ये नोकरी मिळण्यासाठी कोणते स्किल्स महत्वाचे आहेत ते बघुया ,Power BI मध्ये Pro होण्यासाठी   आवश्यक असलेली काही कौशल्ये खाली दिली आहेत.
 • Power BI हे  MS Excel चे अडव्हांस वर्जन आहे असे आपण म्हणून शकतो , त्यामुळे आपल्याला  MS Excel खूप चांगली माहिती असयला पाहिजे .
 • DAX formula हे power bi आणि   MS Excel सारखेच आहेत त्यामुळे आपल्याला DAX formula चे खूप चांगली माहिती असयला पाहिजे .
 • Data Modeling हा एक power bi मधील महत्वाचा घटक आहे , त्यामुळे आपल्याला Data Modeling ची माहिती असली पाहिजे .
 • शेवटी उत्तम dashboard तयार करता यावा जेणे करून आपला रीपोर्ट हा आकर्षक तयार होईल.
 • Structured Query Language (SQL) चे जर थोडी माहिती असेल तर आपण सहजपणे SQL सर्वर वरून  डेटा आपल्या रीपोर्ट साठी  वापरू शकतो .


Power BI च्या संधी  असणारया  भारतातील कंपन्या / Career opportunity in India

 • Dell Computers
 • Capgemini
 • HCL Technologies
 • Coffee Day Group
 • Infosys Limited
 • Wipro Technologies
 • Microsoft Solutions
 • TCS
 • Cognizant
 • Big Four Audit Firms: EY, KPMG, PWC, Deloitte.
म्हणून, जर तुम्हाला मोठ्या  MNC कंपन्यांमध्ये काम करायचे असेल, तर 
Power BI मध्ये करिअर हा एक  उत्तम पर्याय आहे .
वरील सर्व लेख हा  
Power BI मध्ये करिअरशी संबंधित आहेत. त्यामुळे, जर तुम्हाला या क्षेत्रात रस असेल, तर याबाबत योग्य टेनिंग  घ्या, आणि आपल्या स्वप्नातील जॉब मिळावा .
तुमच्या जर काही शंका वा प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट करून कळवा . धन्यवाद .

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने