type='font/woff2'/> सर्वात भारी Resume कसा लिहावा | Resume लिहिण्याच्या भन्नाट टिप्स | Resume Writing for Job Tips 2023

सर्वात भारी Resume कसा लिहावा | Resume लिहिण्याच्या भन्नाट टिप्स | Resume Writing for Job Tips 2023

Resume असा तयार करा कि 100% JOB भेटेल | Resume Writing skills in Marathi 



नमस्कार मित्रांनो,

नोकरी Job शोधत असताना नोकरीसाठी अर्ज करताना आपल्याला Resume लागतो हे तर माहित आहे पण तो रिझुमे कसा पाहिजे त्यात कोणती कोणती माहिती महत्त्वाची आहे याबद्दल खूप गोंधळ आहेत.

पण कोणीच आपल्याला बोटाला धरून रिझुमे कसा तयार करायचा हे शिकवत नाही. उलट काही जण तर आपल्याला खूप घाबरून देतात. पण हा लेख वाचल्यानंतर तुम्ही तुमचा Resume अगदी सहज तयार करू शकणार आहे. 

तुमचा Resume हा तुमचा आरसा असला पाहिजे. ज्यामुळे इंटरव्यू घेणाऱ्या व्यक्तीवर तुमची अशी काय छाप पडली पाहिजे की तुम्हाला ती नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढले पाहिजे.

नोकरी शोधण्याच्या आणि स्ट्रगलिंग काळामध्ये Resume हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा साधन आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमचे स्किल, एक्सपिरीयन्स तुमच्या अचिवमेंट हे सगळे मांडलेले असते.

तुम्ही इंटरव्यू मध्ये बसून बोलण्या अगोदर , तुमचा रिझुमे तुमच्या विषयी बोललेला असतो. मी स्वतः IT क्षेत्रामध्ये मध्ये काम करतो. मी खूप इंटरव्यू दिले आहेत तसेच खूप इंटरव्यू घेतले सुद्धा आहेत. हा लेख मी याच अनुभवावरून लिहित आहे.

भरपूर वेळा मी फक्त resume बघून उमेदवार ला  इंटरव्यू ला बोलावले सुद्धा नाही . याचे कारण कि,

  • रिझुमे मध्ये माहितीचा अभाव .
  • किंवा १०० रिझुमे पैकी जो रिझुमे मला बघून क्षणात प्रभावित करत नाही तो बाजूलाच पडतो .
  • पदासाठी आवश्यक स्किल एक्सपिरीयन्स ची योग्य मांडणी नसणे .

याउलट भरपूर वेळा resume मध्ये जे लिहिले आहे ते  उमेदवार ला  इंटरव्यू  मध्ये बोलता येत नाही .

नोकरीची जाहिरात  किंवा कंपनीचा इतिहास बघून  त्यानुसार कंपनी ला ह्या पदासाठी काय काय गरजेचे आहे हे बघीतले पाहिजे , त्यानुसार Resume तयार केला गेला पाहिजे.

या लेखामध्ये मी तुम्हाला माहितीपूर्ण आणि आकर्षक Resume कसा तयार करायचा यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे, असा रिझुमे तयार केल्याने तुम्ही तुमच्या स्वप्नातला जॉब मिळवण्याच्या प्रवासामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहे .

रिझुम मध्ये कोणते कोणते पॉईंट पाहिजे / How to good resume step-by-step :

१) Contact Information / संपर्क माहिती :

  • तुमच्या रिझुमच्या वरच्या बाजूमध्ये तुमचे पूर्ण नाव , तुमचा फोन नंबर ,पत्ता ,तुमचा ईमेल तसेच तुमचा LinkedIn चा आयडी असेल तर तो सुद्धा टाकू शकता. या ठिकाणी तुमचे टोपण नाव टाकणे टाळावे.
  • एका पेक्षा जास्त फोन नंबर किंवा मेल आयडी देणे टाळावे.
  • पत्ता हा तुमचा सध्याचा पत्ता(Current Address)असावा.

२) Objective / ध्येय किंवा उद्दिष्ट :

  • ह्या  मध्ये तुम्हाला दोन ते तीन ओळींमध्ये तुमच्या करियर चे उद्दिष्ट तुमचे मुख्य कौशल्य आणि तुमचा अनुभव, ध्येय,आकांक्षा या तुम्हाला सांगायचं आहेत.
  • हे वाचून तुम्ही कंपनीसाठी किती महत्वाचे ठरणार आहे हे समजले पाहिजे.

३) Work Experiance / कामाचा अनुभव :

यामध्ये तुम्ही सध्या करत असलेले नोकरी किंवा यापूर्वीच्या कंपन्यांची माहिती द्यायची आहे. हि माहिती देताना,

  • पदाचे नाव
  • कंपनीचे नाव
  • कंपनीचे लोकेशन ( Work Location)
  • कंपनीमध्ये जॉइनिंग चा पहिला व शेवटच्या दिवसाची तारीख असली पाहिजे .
  • त्यानंतर त्या कंपनीमध्ये तुमच्या जबाबदाऱ्या आणि अचीवमेंट यांचे संक्षिप्त वर्णन करण्यात आले पाहिजे

कंपनीची माहिती लिहितानाच तुम्ही उलट्या क्रमाने दिली पाहिजे. म्हणजेच सर्वात पहिल्या कंपनीची माहिती शेवटी असावी.

४) Skills / कौशल्य आणि स्किल्स :

  • या ठिकाणी तुम्हाला तुमची छाप पडण्याची संधी असते कारण तुम्ही तुमचे कौशल्य या ठिकाणी मांडणार आहे.
  • कौशल्य सांगताना दोन पद्धतीने सांगावे जसे की ,

  1. Soft skills मध्ये तुम्ही तुमचे Communication , Leadership , teamwork (संवाद , नेतृत्व) या गोष्टींचा समावेश करू शकता.
  2. Hard skills मध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा  सॉफ्टवेअर , टूल्सवर तुम्ही काम केलेला (Programming Language ,Software ,Tools) हे तुम्ही सांगू शकता.

  • तुम्ही जर उत्तम गायक , खेळाडू , चित्रकार असाल तर ते सुद्धा तुम्ही इथे लिहू शकतात 

ही कौशल्य बघून इंटरव्यू घेणारा तुमच्याविषयी मत तयार करतो की हा कॅंडिडेट खरच या पदासाठी योग्य आहे याची खात्री त्याला होते .

५) Achivments :

  • नोकरीच्या, व्यवसायाच्या किंवा शिक्षणाच्या दरम्यान तुम्हाला जे कोणतेही महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे किंवा पुरस्कार मिळाले आहेत ती तुम्ही या ठिकाणी हायलाईट करू शकता ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही.
  • कोणतेही संबंधित प्रमाणपत्रे किंवा अतिरिक्त प्रशिक्षण हे देखील तुम्ही नोंदवू शकता.

६) Education / शिक्षण :

  • तुमचे शिक्षण लिहिताना पुन्हा ते उलट कालक्रमानुसार लिहिले गेले पाहिजे म्हणजे पदवी उच्च माध्यमिक आणि मग त्यानंतर माध्यमिक.
  • आता इथे तुम्हाला तुमच्या पदवीचे संस्थेचे नाव ठिकाण शैक्षणिक वर्ष तुमचे मार्क्स किंवा ग्रेड हे लिहू शकता‌.

७) Declaration / घोषणापत्र :

  • हे एक प्रकारे दोन ओळीचे घोषणापत्र असते ज्यामध्ये तुम्ही दिलेली वरील दिलेली  माहिती ही योग्य आणि सत्य आहे याची घोषणा करतात.
  • आणि तिथे दिनांक , स्थळ आणि तुमची सही 


आता हे झाले Resume मध्ये कोणते कोणते पॉईंट्स असले पाहिजे याविषयी आता आपण बघुयात की रिझुमे बनवताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

Resume बनवताना महत्त्वाच्या टिप्स /Important Tips for Resume Writing 

Keep it simple

  • तुमच्या Resume मध्ये साधा , थोडक्यात ,अक्षरांची सुसंघता , स्पष्ट असला तर तो सुंदर दिसतो.
  • Resume लिहिताना बुलेट पॉईंट चा उपयोग करावा
  • आवश्यक तिथे हायलाईट किंवा बोर्ड ऑप्शन वापरावे .

Select the right resume format

  • भरपूर वेळा आपण आपल्या कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर एका फॉरमॅटमध्ये आपला Resume तयार करतो आणि तो  दुसऱ्या कॉम्प्युटरवर आहे तसा ओपन होत नाही .
  • Resume हा हिंदी , मराठी किंवा इतर स्थानिक,प्रादेशिक भाषांमध्ये असेल तरीसुद्धा हा ही समस्या निर्माण होते .
  • त्यामुळे Resume पाठवताना किंवा सेव्ह करताना हा पीडीएफ फॉरमॅटमध्ये PDF Format असावा जेणेकरून तो कोणत्याही कॉम्प्युटर ओपन केल्यावर फॉरमॅटमध्ये बदल दिसणार नाही.

Short and sweet

  • Resume लिहिताना निबंध लिहू नका म्हणजेच क्वांटिटी पेक्षा क्वालिटी वर भर द्या.
  • कारण एक चांगला Resume तुमच्या नोकरीचे चान्सेस 50 टक्क्याने वाढवू शकतो.
  • Resume शक्यतो एक किंवा जास्तीत जास्त दोन पानाचा असावा .

Font

  • Resume लिहीताना Font हा एकदम साधा आणि Font size हि योग्य असावी ज्यामुळे तुमचा Resume सहज  वाचता आला पाहिजे .
  • MS Word मध्ये हे  फॉन्ट  साठी योग्य आहेत,

  1. Calibri(Body)
  2. Times New Roman

  • फॉन्ट साईज: Heading 14-16Pt

                          Normal Text 11-12Pt

Spelling and Punctuation

  • Resume लिहिताना तुम्ही स्पेलिंग आणि विरामचिन्हे या गोष्टींची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे कारण या चुका मुळे तुमचे इम्प्रेशन आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
  • जर समजा एखाद्या वाक्याचे काही शब्दांचे स्पेलिंग चुकीचे असेल किंवा त्या वाक्याची शब्दरचना चुकीची असेल तर ते वाक्य वाचायला अवघड जाते किंवा त्याचा चुकीचा अर्थ होऊन बऱ्याचदा गोंधळ उडू शकतो.
  • म्हणून जेव्हा आपण Resume बनवणार त्यावेळी या गोष्टींकडे लक्ष द्या - चुकीला माफी नाही .

Four eyes check

  • Resume एकदा तयार केल्यानंतर  पुन्हा पुन्हा तपासून बघा
  • स्वतः बघून झाल्यानंतर तो आपल्या मित्रांकडून किंवा आपल्या मार्गदर्शक कडून तपासून घ्या

भरपूर वेळा काही चुका आपल्या लक्षात येत नाही ज्या दुसरा माणूस तुम्हाला सांगू शकतो आणि या प्रकारे आपण कोणत्या प्रकारे चुकीला वाव मिळून देत नाही.

आपल्या आवडीनिवडी टाका

  • आवडीनिवडी टाकताना शक्यतो ज्या विषयी तुम्हाला खरच ज्ञान आहे अशा टाका
  • भरपूर वेळा my hobbies are reading books,playing cricket असे लिहिलेले असताना आपल्याला साधे दोन पुस्तकांची नावे किंवा क्रिकेटचे साधे नियम सांगता येत नाहीत.यामुळे तुमची चुकीची छाप पडते.
  • तसेच बऱ्याच कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये त्यांच्या कामगारांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी प्रयत्न चालू असतात.
  • त्यामुळे आपल्यात असलेल्या कलागुणांना कागदावर एका चांगल्या पद्धतीने उतरवणे म्हणजेच एकप्रकारे स्वतःची जाहिरात करणे होय.

तर ह्या झाल्या काही टिप्स . तुम्हाला हा लेख कसा वाटला किंवा Resume लिहिताना तुम्हाला काही मदत पाहिजे असले तर आम्हाला Comment मध्ये कळवा .

Refer or Download below sample Resume Format  ⇩⇩⇩


टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने