type='font/woff2'/> १२ वी कॉमर्स झालय ना ,मग आता पुढे काय ? Best Career Options and Courses After 12th Commerce

१२ वी कॉमर्स झालय ना ,मग आता पुढे काय ? Best Career Options and Courses After 12th Commerce

१२ वी  कॉमर्स (वाणिज्य ) नंतर करीअर चे हटके पर्याय 

Best Career Options and Courses After 12th Commerce in 2023 in marathi: 

  • महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results) झाल्यानंतर सगळ्यांनाच सेलिब्रेशन चालू होत पण ते फक्त काही वेळेसाठीच . मी असे का म्हणतो आहे कारण बारावीचा निकाल तर लागला. पण ,आता पुढे काय ? 
  • जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मात्र, करिअरच्या दृष्टीने खूप खूप प्रश्न असतात. खरंतर, ही चिंता ज्यांनी मेरिट मध्ये आले आहे त्यांनाही आहे आणि जे उत्तम मार्क ने उत्तीर्ण झाले आहेत त्यांनाही आहे.
  • याचसाठी बारावीनंतर पुढे कोणता करिअर पर्याय निवडावा यासाठी आम्ही तुम्हाला वाणिज्य शाखेतील (Commerce) काही पर्याय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता. 
    वाणिज्य शाखेतून इयत्ता 12 वीचे शिक्षण घेणाऱ्या किंवा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे उत्तम करिअर करण्यासाठी अनेक पर्याय आहेत.पण कोर्स निवडणे कधीही सोयीस्कर पर्याय असू शकत नाही तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचा ,प्रेरणादायी कोर्स निवडावा.

12 वी कॉमर्स नंतर योग्य कोर्स कसा निवडावा ?  How to Choose the Right Course After 12th Commerce? Full form of BCom

  • 12 वी कॉमर्स नंतर योग्य कोर्स  निवडताना तुम्हाला उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती असणे आवश्यक आहे.
  • उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांबद्दल जाणून घेतल्याने , त्या कोर्स अभ्यासक्रम माहिती असल्याने तुम्हाला तुमचे आवडीचे क्षेत्र निवडणे अगदी सोपे होऊन जाते
  • आवश्यक असलेले स्किल्स मिळवण्यावर जर आपण काम केले तर तुम्हाला तुमचा Dream Job मिळण्यास मदत होईल. कोर्स निवडताना खालील मुद्दे तपासून बघा ,
  1. संबंधित कोर्स मध्ये तुमचा इंटरेस्ट ओळखा.
  2. अभ्यासक्रम आणि विषय तपासा.
  3. कोर्स साठी लागणारी पात्रता,अभ्यासक्रमाचा कालावधी,फी तपासा . 

Best courses after 12th commerce

12वी कॉमर्स नंतरच्या टॉप 20 सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रमांची यादी खालीलप्रमाणे,
  1. Bachelor of Commerce (B. Com)
  2. Bachelor of Economics (BE)
  3. Bachelor of Accounting and Finance (BAF)
  4. Bachelor of Commerce in Banking and Insurance (BBI)
  5. Bachelor of Commerce in Financial Market (BFM)
  6. Bachelor of Business Administration (BBA)
  7. Bachelor of Business Administration – International Business (BBA-IB) 
  8. Bachelor of Business Administration – Computer Application (BBA-CA)
  9. Industry Oriented Integrated Courses
  10. Chartered Accountancy
  11. Company Secretary (CS)
  12. Cost and Management Accountant
  13. Journalism and Mass Communication
  14. B. Com (General)
  15. B. Com Marketing
  16. B. Com Tourism & Travel Management
  17. BA in Humanities & Social Sciences
  18. BA LLB
  19. B. Des in Design
  20. Diploma in Education (DEd)
वरील पैकी आपण काही ठरावीक कोर्स ची माहिती आपण ह्या लेखामध्ये बघणार आहे.



12 वी कॉमर्स नंतर पदवी चे कोर्स / Bachelors course after 12th commerce

Bachelor of Commerce (B. Com)

  • बॅचलर ऑफ कॉमर्स हा 3-वर्षाचा Under Graduate प्रोग्राम आहे जो कि विद्यार्थ्यांना वाणिज्य (commerce),अर्थशास्त्र (Economics),व्यवसाय कायदा (Business Law),लेखा (Accountancy),कर आकारणी ( Taxation)या विषयांमध्ये तज्ञ बनवते .
  • बॅचलर ऑफ कॉमर्स मध्ये मुख्यतःसामान्य व्यवसाय आणि अर्थकारण याचे धडे दिले जातात. हा कोर्स मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध आहे .
  • पात्रता : वेगवेगळ्या कॉलेज वा विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी मेरीट लावले जाते , बीकॉम अभ्यासक्रमासाठी पात्रता 12वी HSC किंवा त्यासारख्या  परीक्षेत कमीत कमी 50% गुण मिळवून उतीर्ण असावे.
बीकॉम कोर्स हा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात लोकप्रिय आणि मागणी असलेला कोर्स आहे.बीकॉम चा सिलाबस हा कर आकारणी (Taxation), अर्थशास्त्र (Economics), लेखा (Accountancy) इत्यादी विषयांला महत्व आहे .

b. com ke baad kya kare

B. Com नंतर नोकरीचे पर्याय

पात्रता

संबधित महत्वाच्या कंपनी

सरासरी पगार

Financial Risk Manager

B. Com/ B. Com (Hons) विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते

Deutsche Bank, Deloitte, RBS, HSBC, Citigroup

रू.10 लाख प्रती वर्ष to रू.18 लाख प्रती वर्ष

Business Analyst

B. Com/ B. Com (ऑनर्स) विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते

EY, KPMG, Deloitte, PWC

रू.3.5 लाख प्रती वर्ष to रू. 5.5 लाख प्रती वर्ष

Digital Marketer

कोणत्याही शाखेतली पदवी

Deloitte, Accenture, Oracle, Gartner

रू. 4.5 लाख प्रती वर्ष to रू.10 लाख प्रती वर्ष

Accountant

B. Com शाखेतली पदवी

Banks, Corporate Sector Companies

INR 3.5 लाख प्रती वर्ष – INR 18 लाख प्रती वर्ष


Bachelor of Economics (BE)

  • बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स हा ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे जो वस्तू आणि सेवांचे उत्पादन, डीष्ट्रीबुशन याचे अनालिसिस करतो. जे विद्यार्थी बँकिंग आणि फायनान्स आणि इतर मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांमध्ये मोठे बनू इच्छितात ते अर्थशास्त्राची पदवी घेऊ शकतात.
  • पात्रता: विद्यार्थ्यांनी 12वी बोर्ड परीक्षा किमान 50% एकूण गुणांसह किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून समतुल्य CGPA उत्तीर्ण केली पाहिजे.
  • नोकरीचे पर्याय : Economic Researcher ,Sales Analyst ,Economist ,Securities Analyst ,Trainee Investment Analyst ,Fixed Income Portfolio Manager , Investment Administrator , Financial Service Manager , Customer Profit Analyst
सरासरी पगार: ६  ते ८.५ लाख प्रति वर्ष

Bachelor of Accounting and Finance (BAF)

  • बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स (BAF) हा तीन वर्षांचा ग्रेजुएट कोर्स आहे जो आर्थिक विश्लेषण (Finance) आणि लेखा मानकांच्या (accounting)अनेक प्रक्रियांशी संबंधित कौशल्ये शिकण्यासाठी इच्छुकांनी ह्या कोर्स ला प्रवेश घावा.
  • पात्रता: ज्या उमेदवारांनी किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा पूर्ण केली आहे.
  • सरासरी पगार: ३ ते 10 लाख प्रति वर्ष
  • संबधित महत्वाच्या कंपनी : EY, KPMG, Deloitte, PWC, Deloitte, Accenture, Oracle, Gartner, SBI, NABARD, PNB, CBI, etc.

Bachelor of Commerce in Banking and Insurance (BBI)

  • बी.कॉम. बँकिंग आणि विमा हा 3 वर्षांचा पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रम आहे जो बँकिंग आणि विमा यांच्याशी संबंधित  विषयांचा बनलेला आहे.
  • पात्रता: मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून 10+2 शिक्षण किमान 50% सह पूर्ण असावे .
  • परीक्षा प्रकार : सेमिस्टर सिस्टम
  • नोकरीचे क्षेत्र :Banks, investments, the insurance industry, savings and loan associations, and such.
  • नोकरी प्रोफाइल :Accountant, Financial Advisor, Marketing Agent, and Sales Representative
  • महत्वाच्या कंपनी :  TCS, Sutherland, HCL, DELL, CTS, CITY Bank, etc.
  • सरासरी  पगार : २ ते २० लाख प्रति वर्ष

Bachelor of Commerce in Financial Market (BFM)

  • बी.कॉम. इन फायनान्शिअल मार्केट्स हा फायनान्शिअल मार्केट्समधील ३ वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. आर्थिक बाजारपेठेमध्ये लोकांना बाजारात रोखे, स्टॉक आणि कमोडिटीज यांसारख्या प्रकारांमध्ये व्यवसाय, व्यापार करण्याचे  ज्ञान मिळते.
  • या कोर्समध्ये कर्ज आणि इक्विटी मार्केट, परकीय चलन बाजार आणि वित्तीय बाजार हे विषय  अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत.
  • पात्रता:  मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून वाणिज्य शाखेतील  10+2 किंवा समकक्ष शाखेतील अभ्यास किमान 50% च्या एकूण गुणांसह पूर्ण केलेली असावी.
  • परीक्षा प्रकार : सेमिस्टर सिस्टम
  • नोकरीचे क्षेत्र : Public Accounting Firms, Policy Planning, Foreign Trade, Banks, Budget Planning, Inventory Control, Merchant Banking, Marketing
  • नोकरी प्रोफाइल :  Finance Controller, Treasurer, Finance Officer, Credit and Cash Manager, Risk Manager, Financial Research Manager, Financial Planning Manager, Trainee Associate, Financial Planning Consultant

B. Com Tourism & Travel Management

  • बॅचलर ऑफ कॉमर्स इन टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हा 3 वर्षांचा पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रम आहे जो प्रवास आणि पर्यटन व्यवसायाच्या संबंधित आर्थिक आणि आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो.
  • कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन मार्केटिंग (tourism marketing), हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस कम्युनिकेशन, इकॉनॉमिक्स, फायनान्शियल मॅनेजमेंट, रेव्हेन्यू मॅनेजमेंट, इको-टुरिझम आणि बरेच काही यासारख्या विषयांवर हा कोर्स केंद्रित आहे.

Mass Communications and Journalism / जनसंवाद आणि पत्रकारिता

  • मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम हा वर उल्लेख केलेल्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा करिअर मार्ग आहे. 
  • 12वी कॉमर्स नंतरचे बहुतेक करिअरचे मार्ग हे फायनान्स आणि बिझनेस फील्डच्या धर्तीवर आहेत. 
  • हा कोर्स अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे स्वतःला मीडिया हाऊस आणि क्रिएशन संबंधित क्षेत्रात काम करू इच्छितात. 
  • हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे जो तुमचे स्किल्स विकसित करतो आणि तुम्हाला मीडिया, जनसंपर्क, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि इतर यासारख्या क्षेत्रात करिअर पर्याय शोधण्यात मदत करतो.

   तुमच्या मनातले प्रश्न :   


What is the best course after 12th Commerce?

>> 12वी कॉमर्स नंतर, तुमच्याकडे अभ्यासक्रमांसाठी अनेक पर्याय आहेत, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
B.Com (Bachelor of Commerce)
BBA (Bachelor of Business Administration)
CA (Chartered Accountancy)
CS (Company Secretary)
CMA (Cost and Management Accountancy)
BMS (Bachelor of Management Studies)
Banking and Finance courses
Economics (Hons.) or related courses


Which job has the highest salary in commerce?

>> वाणिज्य क्षेत्रातील काही सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्यांमध्ये गुंतवणूक बँकर्स (Investment Bankers),व्यवस्थापन सल्लागार (Management Consultants),चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountants)आणि डेटा विश्लेषक (Data Analysts)यांचा समावेश होतो.


What are the options after 12th commerce?

>> 12वी कॉमर्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही फायनान्स, अकाउंटिंग, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, बँकिंग आणि बरेच काही यासारख्या क्षेत्रात विविध प्रकारचे करिअर करू शकता.

Which career is best for the future in commerce?

>> भविष्यातील संभाव्यतेच्या दृष्टीने, डेटा सायन्स, फायनान्शियल अॅनालिसिस, ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रातील करिअरला महत्त्व प्राप्त होईल असे म्हंटले जात आहे.

Which is better, BBA or BCom?

>> बीबीए आणि बीकॉम हे दोन्ही चांगले पर्याय आहेत, परंतु त्यांचे अभ्यासक्रम वेगळे आहे. बीबीए हा  व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंटशी संबधीत आहे, तर बीकॉम वाणिज्य विषयांची सखोल माहिती देणारा कोर्स आहे . 
तुमच्या आवडी आणि करिअरच्या ध्येयांवर आधारित निवडा.

Which stream has more money?

>> नोकरीची क्षेत्र , उद्योग, अनुभव आणि पद यासारख्या घटकांवर आधारित पगार कमी जास्त होतात . तसेच , वित्त, गुंतवणूक बँकिंग आणि व्यवस्थापन सल्लामसलत या व्यवसायांमध्ये जास्त पगार देतात.

Which stream is in demand?

>> डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग, फायनान्शिअल अॅनालिटिक्स आणि ई-कॉमर्स सारख्या क्षेत्रांना सध्या तांत्रिक प्रगती आणि बदलत्या ग्राहकांच्या वर्तनामुळे जास्त मागणी आहे.

Does commerce have scope in the future?

>> होय, भविष्यात वाणिज्य क्षेत्रात खूप डिमांड आहे. व्यवसाय आणि उद्योगांना नेहमी वित्त, लेखा, व्यवस्थापन आणि संबंधित क्षेत्रातील तज्ञांची आवश्यकता असते.
लक्षात ठेवा की "सर्वोत्तम" निवड ही तुमच्या आवडी, कौशल्ये आणि लान्ग टर्म गोल यावर अवलंबून असते. सखोल संशोधन करणे, तुमच्या आवडींचा विचार करणे आणि तुमच्या आकांक्षा आणि सामर्थ्यांशी जुळणारे पर्याय एक्सप्लोर करणे महत्त्वाचे आहे.

which of these is not a benefit for businesses using fully integrated e-commerce platforms?

आम्हाला आशा आहे की 12वी कॉमर्स नंतर करिअर पर्यायांवरील हा ब्लॉग उपयुक्त ठरेल . जर तुम्ही वाणिज्य शाखेतील असाल आणि वाणिज्य शाखेतील उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांबद्दल तुम्ही द्विधा मनस्थितीत असाल, तर आम्हाला आशा आहे की हा ब्लॉग तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने