type='font/woff2'/> मोबाईल चोरी किंवा हरवला आहे का? काळजी नको! सरकारच्या CEIR संचार सारथी पोर्टलवर मोबाईल शोधा Block IMEI number 2023 Find mobile Lost or Stolen

मोबाईल चोरी किंवा हरवला आहे का? काळजी नको! सरकारच्या CEIR संचार सारथी पोर्टलवर मोबाईल शोधा Block IMEI number 2023 Find mobile Lost or Stolen

 

 

सीईआर(CEIRहे नेमका आहे तरी काय ?हरवलेला किंवा चोरलेला मोबाईल शोधायला केंद्र सरकार आपल्या कशी मदत करणार आहे ? block your IMEI number



नुकतेच भारत सरकारने फोन चोरीची तक्रार करण्यासाठी ceir.gov.in पोर्टल संचार साथी (SANCHAR SAATHI) सुरू केले आहे.

सी इ आय आर म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे एक ट्रेकिंग पोर्टल आहे ज्याद्वारे ज्यांचे  मोबाइल चोरीला किंवा हरवले आहेत ते सहजपणे त्यांची तक्रार नोंदवू शकतात आणि ही पद्धत खूप सोपी आहे .

तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा हरवला असेल तर तुम्हाला ceir.gov.in पोर्टलवर तक्रार नोंदवावी लागेल आणि C-DOT ला हेल्पलाइन नंबर 14422 द्वारे कळवावे लागेल.

अशा प्रकारे, सरकार आता तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यात आणि ब्लॉक करण्यात मदत करेल. 

संचार साथी पोर्टलचे सर्वात वैशिष्ट्य 

१)  तुम्ही तुमचा मोबाईल ब्लॉक करू शकता जेणेकरून तुमचा महत्वाचा आणि खाजगी डेटा चोरीला जाणार नाही. .
२) शिवाय, फोनचा IMEI ब्लॉक केल्याने गहाळ मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता नाहीशी होईल.

भारत सरकारने सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच ईशान्येकडेल प्रदेश या ठिकाणी संचार साथी ही प्रणाली राबवली होती. पण आता संपूर्ण भारतात ही प्रणाली कार्यान्वित झाल्याची घोषणा भारत सरकारने केली आहे.

संचार साथी पोर्टल वर तक्रार कशी नोंदवू शकतो  ते आपण पाहूयात ,

  • प्रथम  तुम्हाला  मोबाईल हरवल्याची रीतसर कंप्लेंट आपल्या जवळील पोलीस स्टेशनला नोंदवून FIR डिजिटल कॉपी द्यावी लागेल.
  • CEIR (ceir.gov.in) पोर्टल ओपेन करा .
  • तिथे  Block Stolen/Lost Mobile हा पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हा form वर खालील माहिती भरायची आहे .
जसे कि ,

    Device Information

    १. मोबाईल नंबर आणि IMEI number
    २. मोबाईल ब्रँडचे , मॉडेल नाव आणि मोबाईल बिल उपलोड करायचे आहे.

    Lost Information

    ३. मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला ती जागा , राज्य
    ४. कंप्लेंट/FIR नंबर आणि FIR ची प्रत उपलोड करा .

     Device Owner Information

    ५.मोबाईल मालकाचे नाव , पत्ता , ओळखपत्र उपलोड करयचे आहे .
    ६. आणि आता इथे OTP साठी alternate म्हणजे पर्यायी  चालू मोबाईल नंबर द्या .

 



  • हि सगळी माहिती भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा , तुम्हाला एक रजिस्टर आयडी भेटेल .
  • C-DOT हेल्पलाइन नंबरवर  (14422) तुमचा रजिस्टर आयडी कळवावे लागेल म्हणजे तुमचा IMEI नंबर पूर्णपणे block होईल पण चिंता करू नका तरीसुद्धा पोलिसाना तुमचा मोबाईल track करता येईल. 

रजिस्टर आयडी वापरून तुम्ही तुमच्या  तक्रारीचे स्थिती बघू  शकता .

 

हा मोबाईलचा IMEI number असतो कुठे ?

What is IMEI number , Where I can get my IMEI number

खालील पैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलचा IMEI मिळवू शकतात

१. मोबाईलच्या  बिलावर.
२. मोबाईल पॅकेजिंग बॉक्सवर.
३. मोबाईलवर  *#06# हा नंबर IMEI डायल करून  .                         

 

आपल्या तक्रारीचे स्थिती कशी पहावी (Check Request Status)



  • CEIR (ceir.gov.in) पोर्टल ओपेन करा .
  • तक्रार नोंदवल्यावर वापरकर्त्याला एक रजिस्टर आयडी दिला जातो तो तिथे टाका .
  • alternate म्हणजे पर्यायी  चालू मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी दिल्यानंतर तक्रारीचे सर्व तपशील वापरकर्त्यास उपलब्ध होतो.

मोबाईल सापडल्यास पुन्हा चालू करण्यास काय करावे (Unblock Found Mobile)

  • CEIR (ceir.gov.in) पोर्टल ओपेन करा .
  • Unblock Found Mobile हा पर्यायावर क्लिक करा.
  • रजिस्टर आयडी देऊन alternate म्हणजे पर्यायी  चालू मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी पोर्टल वर टाकून  फोन Unblock होईल .


जुना मोबाईल विकत घेताना हे चेक करा . (Know Your Mobile (KYM) Portal)

 

Know Your Mobile(KYM) सुविधा मोबाईल वापरकर्त्यांना CEIR संचार साथी ने उपलब्ध केली आहे .

याद्वारे तुम्ही मोबाईल खरेदी करण्यापूर्वी देखील तपासू शकता, यासाठी तुम्हाला पॅकेजिंग बॉक्स किंवा मोबाइल बिल वर लिहिलेला IMEI वापरावा लागेल.

 जर मोबाईल स्टेटस ब्लॅकलिस्टेड (Blacklisted) किंवा डुप्लिकेट दाखवत असेल तर सावधान तुम्ही तो  मोबाईल विकत घेऊ नका कारण तो मोबाईल  चोरीचा असू शकतो .

तुम्ही तीन पद्धतींने  Know Your Mobile (KYM) वापरू शकता:-

१. SMS
 तुम्हाला तुमच्या मोबाइलवरून KYM <15-अंकी IMEI नंबर> टाइप करून 14422 वर पाठवावा लागेल. फोनची स्थिती तुमच्या स्क्रीनवर असेल.

२. KYM App
 KYM अप्लिकेशन  download करा , तुम्ही KYM अॅपमध्ये IMEI नंबर टाकल्यास, तुम्ही तुमच्या मोबाइलची स्थिती तपासू शकता.

 ३.  KYM CEIR पोर्टल
CEIR पोर्टल वर KYN वर किल्क करा IMEI नंबर टाकल्यास, तुम्ही तुमच्या मोबाइलची स्थिती तपासू शकता.


तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हला कॉमेंट लिहून कळवा .


टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने