type='font/woff2'/> इस्रोचे चंद्रयान -३ आहे तरी काय इस्रोची महात्वाकांशी मोहीम |Mission Chandrayaan-3 2023

इस्रोचे चंद्रयान -३ आहे तरी काय इस्रोची महात्वाकांशी मोहीम |Mission Chandrayaan-3 2023

भारत पुन्हा चंद्रावर पाय ठेवण्यासाठी सज्ज chandrayaan 3 launch dateChandrayaan-3 Launch Date : पंतप्रधान मोदी ISRO चिफ  के. सिवन K. Sivan यांना धीर देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता,
कारण संपूर्ण जगाचे लक्ष ज्या चंद्रयान -२ मिशन कडे होते ते मिशन अयशस्वी झाले आणि त्यामुळे इस्रो चे के. सिवन भाऊक झाले तेव्हा पंतप्रधान मोदीनी त्यांची गळा भेट घेतली आणि सांगितले कि"संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे."

चंद्रयान-२ जेव्हा अयशस्वी झाले तेव्हा  इस्रोच्या संशोधकांनी हे अपयश आव्हान म्हणून स्वीकारले आणि फक्त चारच वर्षात चंद्रावर भारताचा तिरंगा फडकावण्यासाठी चंद्रयान-३ तयार केले. 

 • 1969 साली NASA च्या Apollo-11 द्वारे निल आर्मस्ट्राँग Neil Armstrong ने चंद्रावर पहिल्यांदा पाय ठेवला होता ,पृथ्वीवरील लोकांना चंद्राचे प्रथमच इतके जवळून दर्शन झाले होते .नासाच्या या मोहिमेनंतर जगभरातील देशांची चंद्रावर जाण्यासाठी चढाओड चालू झाली. पण हे एवढं सोपं नव्हतं.
 • 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने सुद्धा चंद्रावर जाण्याचे स्वप्न बघितले व त्यासाठी चंद्रयान मोहीम म्हणजेच लुणार मिशन Lunar Mission of India सुरू केले .

चंद्रयान मिशन हे भारतासाठी महत्त्वाचे का आहे?

 •  भारताची चंद्रयान मोहीम चंद्राच्या ज्या बाजूचे संशोधन करणार आहे त्या जागेची माहिती आजपर्यंत कुठल्या देशाकडे उपलब्ध नाही. 
 • जर भारत या मोहिमेमध्ये यशस्वी झाला तर Global Community आणि Leading Spacefaring Nation मध्ये भारताचे नाव उंचावेल जाईल .
 • चंद्रयान-२ हे जगातले पहिले अशी मोहीम होती की ज्यामध्ये लॅन्डरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो अयशस्वी झाला.तीच मोहीम पूर्ण करण्यासाठी चंद्रयान-३ पाठवले जात आहे-Chandrayaan-2 Follow Up Mission.
 • चंद्राचा दक्षिण ध्रुव जिथे शेकेल्टन क्रेटर - shacklton crater ( crater म्हणजे खड्डा ) जो की 4.2 किलोमीटर चा आहे. आणि तिथे वर्षानुवर्षे सूर्यप्रकाश पडलेला नाही.
 • त्यामुळे येथे कायमस्वरूपी तापमान -267°F एवढे असते .शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार इथे हायड्रोजनचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी सापडण्याची शक्यता आहे.
 • इथे साधारणपणे शंभर लाख टन स्फटिक स्वरूपात पाण्याचा साठा असु शकतो.
 • यासोबत इथे अमोनिया,मिथेन,सोडियम,मर्क्युरी आणि सिल्वर सारखे खनिज आढळून आले आहे .
  हे सगळे संशोधन करणारा भारत हा प्रथमच देश असेल म्हणून  चंद्रयान-३ मिशन हे महत्त्वाचे आहे. 
अमेरिका,रशिया,जपान,चायना आणि युरोपच्या स्पेस एजन्सीज सुद्धा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर  पोहोचण्याच्या प्रयत्न्य करत आहे.

काय आहे चंद्रयान मोहीम  What is Chandrayaan

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO full form)ची चंद्रयान मोहीम ही चंद्राच्या निरीक्षण आणि संशोधनासाठी सुरु करण्यात आली आहे.
 • ह्या मोहीमेची सुरुवात चंद्रयान-१ पासून सुरुवात झाली चंद्रयान-१ हे २२ ऑक्टोबर २००८ रोजी चंद्राच्या कक्षेत लँड करणार करण्यात यशस्वी झाले आणि असे करणारा भारत हा जगातला चौथ्या क्रमांकाचा देश बनला.
 •  चंद्रयान-१ मिशनमध्ये भारताने पहिल्यांदा चंद्रावर पाणी आहे हे शोधून काढले . 

चंद्रयान-३ चे बजेट Budget Of Chandrayaan-3 :

 • चंद्रयान-3 मोहिमेचा खर्च ६१० कोटी रुपये एवढा सांगण्यात येत आहे जो की इतर देशांच्या चंद्र मोहिमेच्या तुलनेत कित्येक पटीने कमी आहे.
 • इस्रो हे त्याच्या यशस्वी आणि स्वस्त मोहिमांसाठी प्रसिद्ध आहे.
 • मंगळयान मिशनवरून आपल्याला याची ख्याती समजते अवघ्या 73 मिलियन डॉलर आणि पहिल्याच प्रयत्नात भारताने मंगळावर पोहचून अख्या जगाला तोंडात बोट घालायला लावले होते.
 •  हॉलीवुडचा चंद्रावर आधारित साय-फाय मूवी 'द मार्शल' "The Martian"चे बजेट 108 मिलियन डॉलर होते. 

चंद्रयान 2 chandrayaan 2 information in marathi

 • 22 जुलै 2019 रोजी चंद्रयान-२ Satish Dhawan Space Centre,श्रीहरीकोटा मधून लॉन्च करण्यात आले  होते.
 • चंद्रयान 2 मध्ये ऑर्बिटर, लन्डर आणि  रोवर सोबत पाठवण्यात आले होते.
 •  दुर्भाग्याने चंद्रावर पोहोचण्याच्या काही किलोमीटर अगोदर लन्डर विक्रम चा स्पेस सेंटर पासून संपर्क तुटला आणि ते अनियंत्रित होऊन चंद्रावर जाऊन धडकले. 
 • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचे स्वप्न भारताचे धुळीला मिळाले.
 • ISRO च्या संशोधकांनी निराश न होता चंद्रयान-३ ची तयारी चालू ठेवली.

चंद्रयान-३ chandrayaan information in marathi

 • १४ जुलै २०२३ ला दुपारी २ वाजता  चंद्रयान-३  हे GSLV-MKIII रॉकेटच्या मदतीने आकाशात झेपवणार आहे. chandrayaan 3 launch date
 • यामध्ये लन्डर,रोवर असणार आहे जे की चंद्राचे वातावरण आणि भूसंशोधन याची कामे करणार आहे.
 • १ लुणार दिवस म्हणजे १४ पृथ्वीवरील दिवस हि मोहीम चालेल. Lunar polar exploration mission
 • चंद्रयान मोहिमेसाठीचे ब्रीद वाक्य "Science of the moon" हे आहे.

चंद्रयान-३ मध्ये नवीन काय .What's New in Chandrayaan 3

चंद्रयान -२  आणि ३  चे उद्दिष्टे सारखेच असले तरी ISRO संशोधकांनी चंद्रयान-३  मध्ये खूप सारे बदल केले आहे ज्यामुळे चंद्रयान-३  हे अधिक टिकाऊ आणि शक्तिशाली बनले आहेत.
 • इंधन साठवण्यासाठी अधिकची क्षमता
 • मजबूत लँडिंग लेग: चंद्रयान-3 मिशनमध्ये लँडिंग लेगची मजबूती वाढविण्यात आली आहे.
 • अधिक सेन्सॉर आणि मोठे सौर पॅनेल: चंद्रयान-3 मिशनमध्ये अधिक सेन्सॉर असणार आहेत ज्यामुळे अधिक डेटा साठवला जाईल .सोलर पॅनेलचा आकार मोठा केला गेला आहे.
 • अल्गोरिदममध्ये सुधारणा
 • नवीन सॉफ्टवेअर: चंद्रयान-3 मिशनमध्ये नवीन सॉफ्टवेअर वापरण्यात आला आहे, ज्यामुळे लेंडरच्या लँडिंग पॉईंट बदलवू शकतो.

चंद्रयान-3 ही मोहीम इस्रो सोबत सर्व भारतीयांसाठी श्वास रोखणारी असेल असे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ  यांनी सांगितले.तर मित्रानो आपणसुद्धा ISRO च्या संशोधकांच्या सोबत उभे राहू आणि Misson chandrayaan 3 च्या यशासाठी प्रार्थना करूया .

1 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने