type='font/woff2'/> PARAM-8000:मराठी माणसाने बनवलेला भारताचा पहिला महासंगणक -‘परम-8000’ | डॉक्टर विजय भटकर| India's first Super Computer param-8000

PARAM-8000:मराठी माणसाने बनवलेला भारताचा पहिला महासंगणक -‘परम-8000’ | डॉक्टर विजय भटकर| India's first Super Computer param-8000

Dr. Vijay Bhatkar : the scientist who developed the param-8000 Supercomputer - in marathi

तुम्ही कधी विचार केलाय का की हा हवामानाचा अंदाज जसे कि भारतात मान्सून , दुष्काळ , वादळ यासारखे हवामानात होणारे बदल आपल्या शास्त्राण्याना आधीच कसे काय समजतात. ते शक्य होत Super Computer मुळे . आता हे Super Compute म्हणजे काय?





सुपर कम्प्यूटर ही तंत्रज्ञान विश्वातली अशी क्रांती आहे जी जगातील सर्वच देशांना हवी हवशी वाटनारी आहे. त्यात आपला भारत देश तरी मागे कसा असेल ? स्वत:चा सुपर कम्प्यूटर असणे ही मुळातच भारतासाठी अभिमानाची गोष्ट असणार होती. पण अमेरिकेने केलेल्या अपमाणामुळे एका मराठी माणसाने  Made in India भारताचा पहिला Super Compute तयार केला. आणि ते होते डॉ. विजय भटकर (Dr. Vijay Bhatkar - Father of India's Super Computer). 

डॉक्टर विजय भटकर हे आकोला जिल्हातले . १९७२ साली IIT,दिल्ली  मध्ये असताना भटकरांवर डॉक्टर विक्रम साराभाई यांचा चांगलाच प्रभाव होता म्हणूनच त्यांनी भारतातच राहून देशासाठी संशोधन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

महासंगणक म्हणजे नेमकं काय ? What is Super Computer?

आपण वापरत असलेला संगणक (Personal Computer) हा आपल्या घर आणि आफिस कामात मदत करतो. पण ज्या ठिकाणी मोठा डेटाबेस हँडल करायचा असतो किंवा एकावेळी अब्जावधी कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करायचे असतात त्या ठिकाणी सुपर कम्प्युटर चा उपयोग होतो. 

एक सुपर कम्प्युटर हा कमीत कमी शंभर किंवा हजार कम्प्युटरचा मिळून बनलेला असतो आणि त्यामुळे सुपर कम्प्युटरची गती ही साधारण कम्प्युटरच्या तुलनेत हजारो पटींनी जास्त असते आणि त्याची अचूकता ही जास्त असते. सुपर कम्प्यूटर हा आकारणे  आणि किमतीने सुद्धा प्रचंड असतो .

मोठ्या संस्थांमध्ये खूप जलद आणि पारदर्शकपणे काम करण्यासाठी  महासंगणक वापरले जातात. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे.एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.

अमेरिकेने भारताला सुपर कम्प्यूटर देण्यास "नकार" दिला.

  • स्वत:चा सुपर कम्प्यूटर असणे ही मुळातच अभिमानाची गोष्ट! तंत्रज्ञान विश्व काबीज करणाऱ्या पाश्चिमात्य जगाने जवळपास ६० च्या दशाकामधेच महासंगणक  क्रांती घडवून आणली आहे. 
  • राजीव गांधी यांनी भारताला तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनवण्याचे हेतूने अमेरिकेकडे सुपर कम्प्युटरची मागणी केली.परंतु माघाताक्षणी अमेरिकेने मान्य करावे अमेरिका एवढी मोकळ्या मनाची आहे का!   
  • भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वत: वैयक्तिक विनंती करून देखील अमेरिकेचे राष्ट्रपती ‘रोनाल्ड रेगेन (Ronald Reagan)' यांनी भारताला सुपर कम्प्यूटर देण्यास स्पष्ट "नकार" दिला.
  • २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना हा नकार प्रगतीची कास धरणाऱ्या आपल्या देशाच्या अगदी जिव्हारी लागला.
  • १९८६ साली  भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी CSIR म्हणजेच कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ची  बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये मध्ये राजीव गांधींनी अनेक भारतीय वैज्ञानिकांसमोर हा मुद्दा मांडला.
  • त्यावेळी सुपर कम्प्युटरची भीक मागण्याच्या कल्पनेला डॉ. विजय भटकर यांनी कट्टर निषेध केला .
  • तेव्हा राजीव गांधी यांनी  भटकरांना तीन प्रश्न विचारले 
राजीव गांधी : आपण महासंगणक तयार करू शकतो का ? 
विजय भटकर : अमेरिकेचा  महासंगणक मी फक्त फोटो मध्ये बघितला आहे पण आपण आपला महासंगणक तयार करू शकतो.
राजीव गांधी : किती खर्च येईल ?
विजय भटकर : अमेरिकेतून त्याला आणण्यासाठी जितके पैसे लागतील त्यापेक्षा कमी पैशांमध्ये .
राजीव गांधी : किती वेळ लागेल ?
विजय भटकर : जेवढा वेळ आपण अमेरिकेचा महासंगणक मिळवण्यासाठी चर्चेत घालवला आहे किंवा घालवणार आहे त्यापेक्षा कमी वेळेमध्ये आपण आपला महासंगणक तयार करू शकतो.

  • मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याचा  स्वाभिमान हे त्याचे आकर्षण ठरते. 
  • पंतप्रधानांनी मान्यता दिली पण त्यांना अजूनही खात्री बसली नव्हती की अमेरिकेसारखा महासंगणक आपण बनवू. 
  • महासंगणक बनवण्यात आत्मनिर्भर होण्यासाठी 1988 मध्ये सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ एडवांस्ड कंप्यूटिंग (C-DAC) स्थापना केली.
  • C-DAC च्या  इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख डॉ विजय भाटकर यांची नियुक्ती केली. 
  • या प्रकल्पासाठी सरकारने 30 मिलियन डॉलर्स इतकी रक्कम देण्याचे मान्य केले जे कि इतर देशांच्या सुपर कम्प्युटर बनवण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या अगदी शुल्लक रक्कम होती. हे भारतीय शास्त्रज्ञांसाठी एक चॅलेंजच होते.
  • अखेर  १९९१  साली तो ऐतिहासिक दिवस आला आणि भारताला स्वदेशी बनावटीचा महासंगणक मिळाला ज्याचे नाव "परम- 8000" PARAM-8000 ठेवले. परम ह्या संस्कृत शब्दचा अर्थ आहे "सर्वश्रेष्ठ".

 भारतासारख्या विकसनशील देशाने महासंगणक बनवला हे पाहूनच सर्वांच्या भुवया उंचावल्या अमेरिकेने तर आश्चर्याने तोंडात बोटे घातली.

अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जनरल (Wall Street Journal)मध्ये फ्रंट पेजवर बातमी आली - "India Did It "

   अमेरिकेला आपले अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतासारख्या एका विकसनशील देशाला द्यायची इच्छा नव्हती. पण इतक्या कमी पैशात आणि कमी वेळेत भारताच्या बुद्धीमंतांनी त्यांच्या मेहनतीने हा चमत्कार घडवून आणला.  

 आज भारताचे ८ सुपर कम्प्यूटर सिंगापूर, कॅनडा, रशिया, जर्मनी या देशांमध्ये काम करत आहेत. तसेच भारताने उझबेकिस्तान, व्हिएतनाम,टांझानिया, घाना, म्यानमार, नेपाळ, कझाकस्तान, अर्मेनिया आणि सौदी अरेबिया  या देशांना महासंगणक विकले आहेत. २०२० सालाच्या आकडेवारी प्रमाणे परम सिरीजचा परम सिद्धी AI हा जगात ६३ व्या स्थानावर आहे .

डॉक्टर विजय भटकर यांच्या उदाहरणावरून हे शिकण्यासारखे आहे की हट्टाला पेटलेला मराठी माणूस काहीही करू शकतो . भारत सरकारने डॉ. विजय भटकर यांना पद्मभूषण व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे .

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला Comment मध्ये कळवा .

2 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने