type='font/woff2'/> एकाच वेळी सगळे मोबाईल का वाजले |वॉर्निंग अलर्ट मुळे नागरिकांमध्ये गैरसमज तसेच भीतीचे वातावरण| receiving emergency alerts on mobile

एकाच वेळी सगळे मोबाईल का वाजले |वॉर्निंग अलर्ट मुळे नागरिकांमध्ये गैरसमज तसेच भीतीचे वातावरण| receiving emergency alerts on mobile


नागरिकांमध्ये चिंता वाढवणारा मेसेज |Receiving  emergency alerts on mobile by telecom department of India  


 Emergency Alert on Mobile : आज सकाळपासून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या भरपूर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर दूरसंचार विभागाकडून एक टेस्ट वॉर्निंग अलर्ट आला होता.
परंतु कोणत्याही सूचना आणि माहिती  च्या अभावी  हा अलर्ट एक प्रकारे नागरिकांमध्ये गैरसमज तसेच भीतीचे वातावरण निर्माण करणारा ठरत आहे.
परंतु संजय शिंत्रे ( सुप्रिंटन ऑफ पोलीस महाराष्ट्र सायबर डिव्हिजन ) यांनी यावर स्पष्टीकरण  देत सांगितले आहे की " हा फोटो मेसेज हा अतिवृष्टी किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार तयार करण्यात आलेला आहे . त्याचीच रंगीत तालीम म्हणून हा टेस्ट मेसेज सर्व नागरिकांमध्ये पाठवण्यात आला , त्यालाच आपण DR Drill असे म्हणतो . हा मेसेज दूरसंचार कंपन्यांकडून पाठवण्यात आला आहे तरी  नागरिकांनी  विनाकारण काळजी करू नये व घाबरू नये."

दररोज आपल्याला विविध एप्लीकेशनचे नोटिफिकेशन मुळे आपला मोबाईल व्हायब्रेट झालेला दिसतो आणि आपण ते सहजपणे दुर्लक्षित सुद्धा करतो परंतु ह्या आपत्कालीन अलर्टची सगळ्यांनी दखल घेतली याचाच अर्थ ही Drill  यशस्वी झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांपर्यंत कोणत्याही आपत्कालीन वेळी महत्त्वाचे मेसेज सरकार द्वारे पाठवण्याची ही एक चांगली कल्पना आहे. 

Emergency Alert Test Message Notifying Mobile Users Raises Suspicion



1 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने