type='font/woff2'/> Hydrogen Train : भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन " वंदे मेट्रो " | Hydrogen for Heritage Vande Metro Indian Railway

Hydrogen Train : भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन " वंदे मेट्रो " | Hydrogen for Heritage Vande Metro Indian Railway

धुराच्या रेषा नाहीतर शुध्द पाणी सोडणारी हायड्रोजन ट्रेन " वंदे मेट्रो " | Vande Metro 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.४१ लाख कोटींची तरतूद केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसाठी जाहीर करण्यात आलेल्या तरतुदीवर आनंद व्यक्त करत हायड्रोजन ट्रेनची (Hydrogen Train) घोषणा केली आहे.

रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे . वंदे भारत Vande Bharat च्या यशानंतर आगामी हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या वंदे मेट्रो Vande Metro Train म्हणून ओळखल्या जातील.

एका मर्यादेबाहेर होणारे कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन हे ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरनामधील बदलाला कारणीभूत आहे.आणि वाहतुकीच्या साधनांमुळे कार्बन उत्सर्जनातून मोठया प्रमाणात प्रदूषण निर्माण होते. 

बस आणि गाडयांच्या तुलनेत ट्रेनमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्तच आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन हा एक पर्यावरण पूरक पर्याय ठरू शकतो .

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (first railway minister of india took bold dission) म्हणाले की, भारतातील दुर्गम आणि संपर्क नसलेल्या भागांना रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या धोरणावर वेगाने काम सुरू आहे.

हायड्रोजन ट्रेन म्हणजे काय? What is vande metro

हायड्रोजनच्या माध्यमातून चालणाऱ्या ट्रेन्सला हायड्रेल असे म्हटले जाते. सोप्प्या भाषेत बोलायचे झाल्यास हायड्रोजन ट्रेन म्हणजे जी हायड्रोजनचा वापर इंधनाच्या रुपात करते. म्हणजेच या ट्रेनमध्ये हायड्रोजनचे इंधन वापरले जाणार आहे. 

हायड्रोजन ट्रेन कार्बन डायऑक्साइड, नाइट्रोजन ऑक्साइड किंवा पार्टिकुलेट मॅटर सारखे घातक गॅसचे उत्सर्जन करणार नाही. म्हणजेच हायड्रोजन ट्रेन जुन्या ट्रेडिशनल ट्रेनच्या तुलनेत इंवॉरमेंट फ्रेंडली असतात. 

त्याचसोबत हायड्रोजन गॅस हा नैसर्गिक पद्धतीने तयार केला जातो. त्यामुळे स्पष्ट आहे की, हायड्रोजन ट्रेन भारतीय रेल्वेला ग्रीन इंडिया बनवणार आहेत. मात्र यासाठी लागणारा खर्च हा खुप आहे.

Hydrail चा प्रथम उल्लेख , AT&T मधील  स्टॅन थॉम्पसन (Stan Thompson)यांनी केला होता .

हायड्रोजन सेलमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या   संमिश्रणातून निर्माण झालेली ऊर्जा ट्रेन चालवण्यासाठी वापरली जाते.

जगातली पहिली हायड्रोजन ट्रेन World's First Hydrogen Trainहायड्रोजन ट्रेन्स पहिल्यांदा जर्मनीत सुरू झाल्या. ऑगस्ट २०२२ मध्ये जर्मनीत १४ हायड्रोजन गाड्यांचा ताफा सुरू करण्यात आला आहे. या गाड्या फ्रान्सच्या अल्स्टॉम (Alstom Coradia iLint)नावाच्या कंपनीने बनवल्या आहेत. 

जर्मनी,चीन नंतर भारत हा जगात तिसरा आणि आशियामधील दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जाईल . भारतीय म्हणून आपल्यासाठी हि एक अभिमानाची बाब आहे .

हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या कशा काम करतात?

 • हायड्रोजन फ्युएल  सेल ,जे दोन इलेक्ट्रोडमधील रासायनिक अभिक्रिया वापरून वीज निर्माण करतात .
 •  ट्रेन च्या  छतावर  हायड्रोजन साठवला जातो.  हायड्रोजन हे ऑक्सिजनसोबत फ्युएल सेलमध्ये इंधन म्हणून कार्य करते , जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येतात आणि रासायनिक अभिक्रिया होते.
 •  ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उर्जा वा इंधन सेल द्वारे तयार केलेली वीज ट्रेनच्या मोटरमध्ये दिली जाते आणि ट्रेन गतिमान होते.
 • ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उर्जा तयार होताना कोणताही हानिकारक पदार्थ तयार होत नाही . फक्त शुध्द पाणी तयार होते .

Why Hydrogen हायड्रोजनच का?

 • प्रवासी रेल्वेमध्ये इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराचे अनेक फायदे आहेत .
 • पूर्वी वापरल्या जाणाऱ्या इंधनापेक्षा हायड्रोजन हे अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम ऊर्जा निर्माण करते .
 • हायड्रोजन हा आपल्या पृथ्वीच्या वातावरणामधील  सर्वात मुबलक घटक आहे आणि तसेच तो समुद्राच्या पाण्यापासून सहज सहजी वेगळा केला जाऊ शकतो .
 • हायड्रोजन हा  उर्जेचा स्वच्छ स्त्रोत आहे तसेच झिरो कार्बोन इमिशन Zero Carbon Emission मुळे हा एक पर्यावरण पूरक उर्जा स्त्रोत आहे असे आपण म्हणू शकतो .

 Vande Metro Train हायड्रोजन ट्रेनचे मार्ग :

 हायड्रोजन ट्रेन हि सुरुवातीला दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे, कालका शिमला रेल्वे, माथेरान हिल रेल्वे, कांगडा व्हॅली, बिलमोरा वाघाई आणि मारवाड-देवगड माद्रिया यासह ऐतिहासिक, नॅरो-गेज मार्गांवर धावेल. 

हायड्रोजन ट्रेन किती वेगाने धावू  शकते? How Fast Can a Hydrogen Train Go?

 • हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन ह्या ताशी 140 किमी पर्यंत स्पीडने धावू शकतात आणि एकदा इंधन भरल्यानंतर 1000km पर्यंतचे अंतर पार करू शकतात.
 • या गाड्या १४ मिनिटांपेक्षा कमी वेळेत १४० किमी/ताशी कमाल वेग गाठू शकतात.

हायड्रोजन वायू वर ट्रेन धावू शकतात का? Can Trains Run on Hydrogen?

हायड्रोजन फुअल सेल असलेली ट्रेन हि हायड्रोजनवर धावू शकतात . आणि रासायनिक अभिक्रियेमधून फक्त उष्णता आणि शुध्द पाणी तयार होते ज्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नसतो .

हायड्रोजन गाड्या सुरक्षित आहेत का? Are Hydrogen Trains Safe?

 • हवेत मिसळल्यानंतर हायड्रोजन अत्यंत ज्वलनशील असतो.  एवढे एकच कारण ह्या इंधनाच्या सुरक्षिततेबद्दल  चिंता निर्माण करते . पण हायड्रोजन हवेपेक्षा हलका आहे आणि त्यामुळे हे सहजच हवेत / वातावरणामधे मिसळ जातो 
 • त्यामुळे हायड्रोजन फुअल सेल हे डीझेल इंजिनपेक्ष्या सुरक्षित आहे .

हायड्रोजन ट्रेनचा vande metro चा  मोठ्याप्रमाणावर वापर करणे शक्य आहे का ?

 • नाही , हायड्रोजन ट्रेन तयार करणे हे  आत्ताच्या घडीला खूपच खर्चिक आहे .
 • तसेच हायड्रोजन हा वातावरणामध्ये मुबलक उपलब्ध असला तरीही ICRA च्या नुसार  ग्रीन हायड्रोजन ची भारतामध्ये किंमत ४९२ रुपये प्रती किलो आहे .
 • ह्या मुळे डीझेल  ट्रेनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेन वापरण्याचा खर्च २७% पेक्षा जास्त असू शकतो .

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (first railway minister of India took bold steps)म्हणाले की,

 •  भारतातील दुर्गम आणि संपर्क नसलेल्या भागांना रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिथे इलेक्ट्रिक ट्रेन चालवणे खूप च जिकरीचे आहे तिथे ह्या हायड्रोजन ट्रेन  म्हणजे Vande metro train चा वापर केला जाईल.
 • यामुळे भारतातील दुर्गम भागातील पर्यटनाला देखील चालना मिळेल .
 • यासाठी दोन डेमू  म्हणजेच Diesel Multiple Unit -DMU ट्रेन वर  हायड्रोजन फ्युएल सेल बसवण्याचे काम सुरू करण्यात आले असून, त्यासाठी एका भारतीय कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे ७० कोटी रुपये खर्च येणार आहे.सुरुवातीला हायड्रोजेन ट्रेनचा खर्च अधिक होईल, पण वर्षभराच्या आत याची भरपाई देखील होईल असे मानले जात आहे.

तर मित्रांनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment करून सांगा .

vande bharat express price

vande bharat train ticket price

vande bharat express ticket price


टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने