Quick heal चे कैलाश काटकर यांची यशोगाथा
इच्छाशक्ती, कल्पकता आणि सतत काहीतरी नवीन करायची तयारी एखाद्या माणसाकडून काय काय करून घेऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘क्विकहील टेक्नॉलॉजीज’चे प्रणेते कैलाश काटकर.
आज आपण जेवढ डीजीटल होत चाललो आहोत त्याचवेळी आपल्या मोबाईल,कॉम्पुटर लागलेल्या व्हायरस मुळे आपल्या माहिती आणि मालमत्तेला धोका देखील वाढत आहे . यासाठी आपण जो अॅण्टी व्हायरस वापरतो , Quick Heal हा एका मराठी माणसाने तयार केला आहे.
आज आपण जेवढ डीजीटल होत चाललो आहोत त्याचवेळी आपल्या मोबाईल,कॉम्पुटर लागलेल्या व्हायरस मुळे आपल्या माहिती आणि मालमत्तेला धोका देखील वाढत आहे . यासाठी आपण जो अॅण्टी व्हायरस वापरतो , Quick Heal हा एका मराठी माणसाने तयार केला आहे.
अॅण्टी व्हायरस म्हणजे काय ? What is Computer Anti-virus ?
- व्हायरस म्हणजेच विषाणू , शेतकर्याच्या उभ्या पिकाला किंवा साठवलेल्या धान्याला किडा , उंदीर लागतो म्हणजेच व्हायरस. आणि किडा ,उंदीरापासून पिकाचे, धान्याचे संरक्षण किंवा खात्मा करण्यासाठी शेतकरी कडू लिंबाचा पाला ,विषारी वड्या ठेवतो म्हणजे अॅण्टी व्हायरस ठेवतो .
- पुन्हा करोना चा विषाणू म्हणजे व्हायरस आणि त्या विषाणू सोबत लढण्यासाठी शरीरातील पेशींना चालना देण्यासाठी आपण जी Covi-Shild किंवा Co-Vaxin लस घेतली ती म्हणजे अॅण्टी व्हायरस .
बर चला संगणकीय भाषेमध्ये समजून घेऊया ,
- आपल्या संगणकात कळत नकळत प्रवेश करून , नुकसान करणारा प्रोग्राम म्हणजे व्हायरस.आपण संगणक एखादे अप्लिकेशन चालवतो म्हणजे काय करतो? तर वेगवेगळे प्रोग्राम चालवतो. उदा. एमएस-वर्ड, MS-एक्सेल, काही गेम्स किंवा नेटवर सर्फिंग साठी एखादा ब्राउजर, इत्यादि.
- हे प्रोग्राम आपल्या आज्ञेचे पालन करतात जसे ओपन केले की चालू होतात, आपण सांगू तेव्हढेच काम करतात आणि क्लोज चे बटन दाबले की बंद होतात.
- व्हायरस पण एक प्रोग्रॅम असतो, पण त्याला विशिष्ट पद्धतीने बनवलेले असते जेणेकरुन त्यास बनवणाऱ्या व्यक्तीचा हेतू साध्य व्हावा. हा हेतू काहीही असू शकतो. उदा. संगणकातील माहिती चोरून दुसरीकडे पाठवणे, माहिती डिलीट करणे, दुसर्या प्रोग्राम किंवा softwareचे नुकसान लावणे, CPU/Memory/Storage चा अतिवापर करून संगणकाला मंद करणे, इत्यादी.
कैलाश काटकर - Quick Heal पर्यंतचा प्रवास
- तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असाच एक अॅण्टी व्हायरस आपल्या मराठी भावंडानी बनवला आहे कैलाश काटकर आणि संजय काटकर .
- ह्यांचा जन्म सातारा जिल्हा मध्ये आणि शिक्षण पुणे शिवाजीनगर मध्ये झाले. काटकर बंधूचे वडील हे Philips कंपनी मध्ये काम करत होते.
- कुटुंबाची परिस्थिती जेमतेम होती , त्यात पाठच्या भाऊ बहिणीचे शिक्षण यामुळे थोरल्या कैलाश यांनी आपले शिक्षण ९ वी मध्ये सोडेल आणि 10 वी चे पेपर बाहेरून दिले.
- शिक्षणामध्ये फारसा रस नसलेल्या कैलाश यांना इलेक्ट्रॉनिक वस्तू खोल -फिटिंग ची भलतीच आवड होती .वडिलांसोबत ते रेडीओ दुरुस्ती स्क्रीन पेंटिंग असे काम शिकली होते .
- ८० च्या दशकामध्ये त्यांनी पेपर ला कॅल्क्युलेटर रिपेरिंग साठी भरतीची जाहिरात बगितली आणि इंटरव्ह्यू साठी गेले .तिथे जमलेली गर्दी बघून आपला इथे निभाव लागणार नाही हे त्यांना कळून चुकले होते .
- तरीसुद्धा इंटरव्ह्यू काय प्रकार असतो हे समजून घायचं म्हणून ते बसून राहिले .बर आता इंटरव्ह्यू साठी बायोडेटा लागतो हे काय त्यांना नव्हते आणि बायोडेटा कसा तयार करायचा हे देखील ठावूक नव्हते.
- तसाच इंटरव्ह्यू दिला आणि त्यांचा आत्मविश्वास तसेच ज्ञान बगून इंटरव्ह्यू घेणार्यानेच त्यांचा बायोडेटा तयार केला आणि त्यांना बँकेने ट्रेनिंगसाठी मुंबई ला पाठवले .
- ६ महीन्याच ट्रेनिंग ३ आठवड्यामध्ये पूर्ण करून कैलाश काटकर यांनी पुणे इथे बँकेत काम चालू केले .
- तिथे त्यांनी ledger posting machine आणि कॅल्क्युलेटर रीपेरींग चे काम शिकून घेतले
- एक दिवस बँकेच्या कर्मचार्यांनी संप केला , का तर बँकेचे काम आता कॉम्पुटर वर केली जाणार होती आणि त्यामुळे खूप लोकांच्या नोकर्या जाणार होत्या .
- बर जेव्ह्या बँकेमध्ये कॉम्पुटर आला तेव्हा त्याला एक काचेची केबिन आणि AC लावण्यात आला . केबिन मध्ये जाताना सगळे चपला बूट बाहेर कडून ठेवत .
- हाच त्यो क्षण होता जेव्हा कैलाश काटकर यांनी पहिल्यांदा कॉम्पुटर बघितला आणि कॉम्पुटर हेच भविष्य आहे हे त्यांना कळून चुकले .
- मग आता कैलाश काटकर यांनी कॉम्पुटर रीपेरींग चे काम शिकून , कॅड कॉम्पुटर रीपेरींग नावाने स्वतःचा व्यवसाय सुरु केला.आणि कॉम्पुटर चे महत्व लक्षात घेता भाऊ संजय याला BCS म्हणजे कॉम्पुटर मध्ये पदवी चे शिक्षण घायला सांगितले .
- कॉम्पुटर रीपेरींग करताना कैलाश यांना हार्डवेअर चे प्रोम्बेम लक्षात यायचे आणि ते दुरुस्त देखील करायचे पण सगळे दुरुस्त करूनसुद्धा कधी कधी कॉम्पुटर नीट चालत नव्हता .
- तेव्हा त्यांना व्हायरस हा प्रकार असतो हे समजले जो कि सॉफ्टवेअर मध्ये बिघाड करतो आणि कॉम्पुटर नीट चालत नाही .
- पदवी चे शिक्षण घेणारे संजय जेव्हा दुकानावर यायचे आणि कैलाश यांचा कॉम्पुटर च्या व्हायरस प्रोम्बेम चटकन दुरुस्त करायचे .
- व्हायरस च्या प्रोग्राम बघून त्यावर रिवर्स इंजिनीरिंग करून संजय ने असा एक प्रोग्राम तयार केला कि जो कॉम्पुटर मध्ये रण केल्यावर व्हायरस मुळे कॉम्पुटर मध्ये झालेले नुकसान किंवा बदल दुरुस्त होऊन जायचे .आणि हा होता कैलाश आणि संजय काटकर यांच्या Quick Heal Antivirus चा पहिले व्हर्जन.
Quick heal - तुमच्या कॉम्पुटर मध्ये कोण राहतो व्हायरस कि ?
- तिथून पुढे कैलाश हे संजय चा अँटी-व्हायरस प्रोग्राम फ्लॉपी डिस्क मध्ये ठेवत आणि जिथे कुठे व्हायरस सापडेल तिथे तो अँटी-व्हायरस प्रोग्राम रण करून कॉम्पुटर चटकन दुरुस्त करून द्यायचे .
- नवीन नवीन व्हायरस तयार होत गेले आणि संजय त्यावरचा अँटी-व्हायरस प्रोग्राम तयार करू लागले . त्यावेळी अँटी-व्हायरस फक्त आंतरराष्ट्रीय कंपन्याच तयार करत होत्या. आणि त्यासुद्धा खूप महागड्या दारामध्ये . जे कि सामन्यांच्या खिशाला परवडणारे नव्हते.
- हीच संधी ओळखून कैलाश यांनी स्वतचा ब्रान्ड आणि अँटी-व्हायरस कंपनी स्थापन करायचे ठरवले आणि १९९३ साली Quick heal Software Company चा जन्म झाला.Quickheal म्हणजे जखम लवकर बरी होणे.
- संजय अँटी-व्हायरस प्रोग्राम अपडेट करायचे आणि कैलाश डोर-टू -डोर ते विकायचे . कंपनी चा पहिला अँटी-व्हायरस तब्बल ६ महिन्याने विकला गेला
- अँटीव्हायरस प्रोग्राम्सच्या भविष्यातील मागणीचा अंदाज घेऊन, काटकर बंधूंनी हार्डवेअर दुरुस्ती बाजूला ठेवून आता कॉम्पुटर रेपीरिंग ची काम बंद करून कैलाश आणि संजय काटकर भावंडानी Quick heal Antivirus वर लक्ष केंद्रित केले.
- कारण 90 च्या दशकामध्ये Virus फक्त फ्लॉपी डिस्क मधूनच पसरत होता कारण तेव्हा इंटरनेट नव्हते , कॉम्पुटर चा वापर फारच कमी होत होता .
- पण जेव्हा VSNL ने इंटरनेट चालू केले तसेच भारतामध्ये IT क्षेत्राचा विस्तार व्हायला लागला . तेव्हा Quick heal च्या मागणी मध्ये झपाट्याने वाढ झाली .
- Quick heal चा पण विस्तार झाला . पुणे नंतर नाशिक , नागपूर , इंदोर आणि संपूर्ण भारतामध्ये Quick heal चे ऑफिस चालू झाले ज्यामुळे सेल आणि सर्विस सामान्य कॉम्पुटर यूजर पर्यंत पोह्चले.
- Quick heal ची टॅग लाईन " तुमच्या संगणकात कोण राहतं ? ‘Quick heal’ कि व्हायरस ?" हि तर एका ओळी मधेच भरपूर काही सांगून जाते . आणि सुरुवातीला ब्रांडिंग , मार्केटिंग हे सगळे कैलाश आणि संजय काटकर दोघे मिळून करायचे .
- आंतरराष्ट्रीय कंपन्याच्या अँटी-व्हायरस पेक्षा भारतातील युजरचे प्रोब्लेम लक्षात घेऊन Quick heal तयार झाले होते आणि अपडेट होत गेले . याच मुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करणे Quick heal ला सहजच शक्य झाले.
- बघता बघता कैलाश यांनी Quick heal हि private limited वरून स्टोक मार्केट वर नोंद केली . आह BES वर Quick Heal Technologies चे बाजारमूल्य 1,341.80 कोटी रुपये आहे.
- Quick heal ने जपान, अमेरिका, आफ्रिका आणि यूएईमध्ये शाखा उघडून कंपनी खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली.
प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी असते. कैलाश काटकर यांच्या मते , "व्यावसायिक प्रगतीमधून मी समाजात जर काही देऊ शकतो, समाजासाठी जर काही करू शकतो, तर मी यशस्वी आहे, असे मी मानतो. माझ्यापुरती हीच यशाची व्याख्या आहे."
-----------------
Quick heal Owner Story
What is Anti Virus
Tags
Tech Story