type='font/woff2'/> Titan Submarine: टायटॅनिकचे अवशेष बघायला गेलेल्या पाणबुडी कशी होती | Titanic Ship Titanic Wreck 2023 Titan Submarine incident

Titan Submarine: टायटॅनिकचे अवशेष बघायला गेलेल्या पाणबुडी कशी होती | Titanic Ship Titanic Wreck 2023 Titan Submarine incident

Ocean Gate Titan पाणबुडी आणि Titanic Mystery 


तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले विकसित झाले तरी पण निसर्गाला आव्हान करू शकत नाही. याचाच प्रत्यय आपल्याला काही दिवसांपूर्वी आला आहे .
११० वर्षापुर्वी समुद्रामध्ये गडूप झालेल्या Titanic जहाजाचे अवशेष बघण्यासाठी एक टायटन नावाची पाणबुडी पाच लोकांसह बेपत्ता झाली. 
पण इतक्या वर्षानंतरही समुद्रातले Titanic जहाज बघण्यासाठी एवडी उत्सुकता का आहे.


Titanic जहाज बघण्याची उत्सुकता :

  • जगातला सगळ्यात मोठा जहाज , न बुडणारे जहाज किंवा महायुद्धाच्या  उंबरठ्यावर महाशक्तीचे प्रतिक असे म्हणून ज्या जहाजाची चर्चा १९१२ मध्ये होत होती ते जहाज होते " द टायटॅनिक " .The Titanic
  • ४६,३२८ टन वजन , ८९२ सेवक  ,८८२ फुट  लांब , ९२ फुट रुंद  २४३५ प्रवासी क्षमता  असलेले हे विशालकाय जहाज . एखाद्या पंचतारांकित हॉटेलला सुद्धा लाजवेल असं मोठे जिने, गरम पाण्याचे स्विमिंग पूल ,बार , जिम, रेस्टॉरंट आणि एक लायब्ररी .
  • हे जहाज बनवताना इतके सेफ्टी मेजर्स वापरले गेले होते की हे जहाज अनसिंकेबल ( Unsinkable) म्हणजेच कधीही न बुडणार आहे असं मानलं जात होतं पण तरीही ते त्याच्या पहिल्याच प्रवासादरम्यान 14 आणि 15 एप्रिल 1912 च्या मध्यरात्री टायटॅनिक अटलांटिक महासागरात  एका विशाल हिमनगाला धडकले आणि बुडाला.
  • त्यावेळेचे ३५० कोटी रुपये खर्च करून बनवलेले " द टायटॅनिक " जहाज त्याच्या पहिल्याच प्रवासामध्ये समुद्रामध्ये गडूप झाले .
  • लोकांच्या मनातल्या टायटॅनिक जहाजाविषयी उत्सुकता आजही कमी झालेली नाहीत याचे सगळ्यात मोठं कारण म्हणजे १९९७ साली आलेला टायटॅनिक सिनेमाने प्रचंड प्रसिद्धी कमावली आणि सहा होऊन अधिक ऑस्कर पुरस्कार मिळावले तेव्हापासूनच या जहाजाविषयी लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालेला आपल्याला दिसतं जे आजही टिकून आहे आणि आजही लोक समुद्रातले टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाण्याकरिता जीव ध्योक्यात घालून पैसे मोजत आहेत .
  • 2030 सालापर्यंत हे जहाज समुद्रातून संपूर्णपणे नावर्षी होईल कारण  जहाजाचे वेगवेगळे अवशेष समुद्राच्या पाण्यात असणारे जिवाणू जहाजाच्या लोखंडी आवरणाला कुरतडून  नष्ट करतात दिवसाला 180 किलो जहाजाला नष्ट करतात आज इतक्या वर्षांनी या जहाजाचे अवशेष हळूहळू नष्ट होत आहेत .आज इतक्या वर्षांनी या जहाजाचे अवशेष हळूहळू नष्ट पावत चालले आणि त्यामुळे लोकांच्या मनात जहाजाविषयीची उत्सुकता वाढत जाते आणि ते संशोधन करायला जातात.

तर अशीच एक पाणबुडी पाच लोकांसह समुद्राखाली टायटॅनिक बघण्यासाठी गेली होती ती म्हणजे ओशनगेट कंपनीची टायटन (Ocean Gate Titan) हि पाणबुडी . ती पाणबुडी catastrophic Implosion म्हणजेच समुद्राखालील दाबामुळे झालेल्या स्पोटामुळे समुद्रामध्ये विखुरली गेली . 

2023 Titan Submarine incident

टायटॅनिक भोवतीचा समुद्र खरच इतका भयंकर का आहे . SEA around Titanic

  •  काळोख :

 टायटॅनिकचे अवशेष अंटालंटीक महासागरात सुमारे ४ किमी खोलीवर तळाशी आहेत . या भागाला मिड नाईट झोन Mid-Night Zone  म्हणतात कारण तिथे सुर्याप्रकाशाही पोहचत नाही .आणि पाणबुडीच्या दिव्यांचा प्रकाश अगदी थोड्या अंतरावर पडू शकतो. त्यामुळे दिशाभूल होण्याची शक्यता असते . काळोख आणि गोठवणारी थंडी , सतत आकार बदलणारा समुद्राखालील  चिखल  यामुळे तुम्ही कुठे आहेत हे फक्त सोनार च्या मदतीने च समजू शकते कारण तिथे रडार सुधा काम करत नाहीत .

  •  खोली :

समुद्राच्या तळाशी पानायचा दाब हा ३९० पट जास्त असतो. हा दाब सहन करण्यासाठी पाणबुडीच कवच खूपच जाड असावे लागते.

  •  समुद्रातले प्रवाह : 

 वारे , लाटा आणि पाण्याच्या घनतेतल्या बदलांमुळे तयार होणारे शक्तिशाली प्रवाह समुद्रात पाहायला मिळतात . त्याच्यामुळे समुद्रामध्ये एकादी वस्तू सहजच इकडची तिकडे होऊ शकते .

  •  गंजलेले टायटॅनिकचे अवशेष :

 ११० वर्षापेक्षा जास्त काळ समुद्राच्या तळाशी असलेल्या टायटॅनिकचे अवशेष आता गंजल्यामुळे कोलमडून पडताय .पाणबुडी खूप जवळ गेली तर त्याठिकाणी ती अडकू शकते किंवा धडकू शकते .

ओशनगेट टाइटन पाणबुडी माहिती Information of Ocean Gate Titan  :

  • ओशनगेट टाइटनची प्रवासी क्षमता हि १ पायलट आणि ४ प्रवासी एवढी आहे .
  • ओशनगेट टाइटनची ९६ तास पुरेल एवढा Oxygen चा साठा आहे , हि क्षमता प्रवासांवर अवलंबून असते.
  • ओशनगेट टाइटनची गती हि ३ नॉटिकल माईल प्रति तास आहे .
  • ओशनगेट टाइटनचे वजन हे १०.४  टन एवढे आहे .
  • ६.७ मीटर (22ft) लांबीची हि पाणबुडी पाण्यात ४ हजार मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते .
  • ह्या मध्ये केवळ एकच बटण आहे
  • गेम खेळताना वापरला जाणारा रिमोट कंट्रोल सारखा हुबेहूब रिमोट कंट्रोलने हि पाणबुडी नियंत्रित केली जाते.पुढे जायचे असेल तर फोरवर्ड बटण आणि मागे यायचं तर बकच बटण दाबायच डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी लेफ्ट राईट चे बटण दाबावे लागते .

या मोहिमेसाठी प्रत्येक प्रवाशाकडून साधारण दोन कोटी रुपये घेण्यात येतात .




  1. हुल   (hull) म्हणजे पाणबुडीचा मुख्य भाग हा पाच इंच कार्बन फायबरपासून बनवले जाते, ज्यामुळे ते उच्च दाब सहन करू शकते.
  2. चार इलेक्ट्रिक थ्रस्टर्सने ( थ्रस्टर्स म्हणजे पाणबुडीची गती आणि दिशा नियंत्रित करण्याचे साधन)  - दोन आडवे, दोन उभे ज्यामुळे पाणबुडीचा  नॉट्सच्या ताशी वेगाने प्रवास करू देते .
  3. व्हिडिओ गेम कंट्रोलर वापरून पायलेट पाणबुडीची गती आणि दिशा नियंत्रित करतो .
  4. वजनामुळे टायटन पाणबुडीला समुद्रसपाटीपासून 2.4 मैल खाली बुडवण्यासाठी मदत होते .आणि ते पाणबुडी पृष्ठभागावर परत येण्यासाठी ते वजन कडून टाकता येते.
  5. Porthole Window 21-इंच जाड काचेच्या खिडकीतून एक नेत्रदीपक दृश्य प्रदान प्रवाशाना बघता येते.
  6. मोहिमेच्या आधी एक टायटॅनियम कॅप हुलवर फिट केली जाते, ते प्रवासी परत येईपर्यंत त्यांना आत सील करते.

ओशनगेट टाइटनचे प्रवासी  /  Passanger of OceanGate Titan

  • स्टॉकटन रश  (Stockton Rush):

हे ब्रिटिश व्यापारी आणि ओशनगेट कंपनीचे मालक आहेत .वयाच्या 19 व्या वर्षी ते  जगातील सर्वात तरुण जेट ट्रान्सपोर्ट पात्रतेचे  पायलट बनला होते .

  • हमिश हार्डिंग Hamish Harding :

हार्डिंग हे अॅक्शन एव्हिएशन Action Aviation या विमान विक्री आणि सल्लागार कंपनीचे अध्यक्ष होते. हार्डिंगने 2019 मध्ये पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांभोवती सर्वात वेगवान  हवाई उड्डाण करण्याचा तसेच महासागराच्या सर्वात खोल भागात सर्वात लांब अंतर प्रवास करण्याचा  गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे .

  • शहजादा दाऊद Shahzada Dawood :

दाऊद हे पाकिस्तानी  उद्योगपती आहेत . एनग्रो Engro एक पाकिस्तानीची ऊर्जा  कंपनी आणि दाऊद हर्क्युलस कॉर्प Dawood Hercules Corp.फर्मचे  उपाध्यक्ष आहेत .

  • सुलेमान दाऊद Suleman Dawood :

सुलेमान हा शहजादा दाऊद  चा मुलगा आहे . तो फक्त १९ वर्षाचा आहे आणि विद्यार्थी आहे .

  • पॉल-हेन्री नार्जोलेट Paul-Henri Nargeolet :

नार्जोलेट यांना  त्याच्या जहाजातील कौशल्यामुळे "मिस्टर टायटॅनिक"  "Mr. Titanic" म्हणून ओळखले जाते. त्यांनी फ्रेंच नौदलात 22 वर्षे सेवा केली , जिथे ते  कमांडर म्हणून 1986 मध्ये ते नौदलातून निवृत्त झाले.


टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने