युपीआयचा भारतातच नाही तर जगातभरात डंका वाजत आहे. पण यूपीआय म्हणजे काय | What is full form of UPI? |what is upi id|what is vpa in upi
कधी विचार तरी केला होता का,रिकाम्या खिशाने आपण काही खरेदीला जाऊ शकतो पण कोणत्याही रोख रक्कामेशिवाय , चेकशिवाय मी पुणे सारख्या शहरामध्ये तसेच माझ्या खेडे गावामध्ये हजारोंचे व्यवहार करू शकतो ते पण फक्त smartphone आणि UPI च्या मदतीने .
आता आल का इथे पुन्हा तंत्रज्ञान आपल्या प्रगती आणि उन्नंतीसाठी . शनिवार असो कि रविवार दिवाळी असो कि दसरा, १ रुपयाचे चोकलेट असो कि १ लाखची गाडी ,खाते क्रमांक, नाव, IFSC Code, बँकेचे नाव लक्ष्यात ठेवायची गरज नाही , NEFT किंवा RTGS सारखे वेळ बघायची गरज नाही तरी पण पैसे पाठवा आणि मिळवा आणि हे शक्य झालं आहे ते UPI मुळे .
यूपीआय म्हणजे काय | What is fullform of UPI? what is vpa in upi
यूपीआय म्हणजेच Unified Payment System ज्या द्वारे क्षणात पैसे ट्रान्सफर केले जातात. ही सेवा मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून काही सेकंदातच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पेमेंट ट्रान्सफर करते.
RBIचे पुर्व गव्हर्नर डॉ. रघुराम जी. राजन यांनी एप्रिल 2016 मध्ये NPCI ने ह्या सेवेचा शुभारंभ केला .आरबीआय (RBI) आणि आयबीए (IBA)द्वारे स्थापित एन पी सी आय (NPCI)UPI ऑनलाईन पेमेंट नियंत्रित करते .भारतात युपीआयने दैनंदिन व्यवहारांवर मजबूत पकड मिळवली आहे. Through cross border agreement एकापेक्षा अधिक बँक खाते कोणत्याही एका पेमेंट ॲपद्वारे (गुगल पे, फोन पे किंवा भीम)जोडले जातात.
UPI आल्यापासून तर पैसे पाठवणे आता SMS पाठविण्या इतके सोपे झाले आहे.
visa/ master/ America express/ PayPal सारख्या बलाढ्य कंपन्याना मागे टाकत यूपीआय जगातील सर्वात यशस्वी पेमेंट प्रणाली ठरली आहे . UPI हे फ्रान्स,इंग्लंड,रशिया,जपान,भूतान,नेपाल,सौदी अरेबिया सारख्या २८ देशांमध्ये लोकप्रिय आहे. UPI Make In India आहे याचा आपण भारतीयांना अभिमान आहे .
आता यामुळे doller चे महत्व कमी होऊ लागल्याने अमेरिकेला मिर्रच्या झोबने तर साहजिक आहे.
UPI खाते उघडण्याच्या स्टेप्स पाहू | Steps To Create UPI Id
1. यूपीआय ला सपोर्ट करणारे कोणतेही पेमेंट ॲप जसे की भीम, गुगल पे किंवा फोन पे गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करावे.
2. ॲप ओपन केल्यावर सर्वात प्रथम तुम्हाला भाषा विचारण्यात येईल ज्यामुळे तुम्हाला ज्या भाषेत वापरणे सोपे असेल ती भाषा तुम्ही निवडाल.
3. पुढे तुमच्या बँक खात्या सोबत जो कोणता फोन नंबर जोडला असेल तो त्या ठिकाणी द्यावा .
4. स्क्रीनवर बँकांच्या नावाची लिस्ट दिली जाईल त्यामधून तुमचे ज्या बँकेचे खाते आहे ती बँक सिलेक्ट करा .
5. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी बँकचे SMS Varification होईल. आणि UPI id तयार होईल .
6.एकदा का तुमचे यूपीआय खाते तयार झाले की तुम्हाला यूपीआय पिन सेट करायचा आहे.
7 . यूपीआय पिन सेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डेबिट कार्ड (ATM)वरील शेवटचे चार अंक आणि कार्डची एक्सपायरी डेट द्यावी लागेल त्यानंतर बँकेच्या पॉलिसीनुसार तुम्ही चार किंवा सहा अंकी पिन सेट करू शकता.
UPI खूप सुरक्षित आहे कारण पेमेंट करताना मोबाइल मध्ये बँकेला लिंक असलेले मोबाईल नंबर चे सिम लागते, त्याच बरोबर दोन पासवर्ड टाकावे लागतात, एक अँप ओपन करताना दुसरा पैसे पाठवताना.
अगदी अंदमानच्या बेटांपासून ते हिमालयातील छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये देखील Online Payment Service उपलब्ध असते.
UPI चे फायदे काय आहेत ? | Benifits of UPI Payments
- यू पी आय चा वापर करून आपण एकापेक्षा जास्त बँक खात्यांना एकाच मोबाईल अँप्लिकेशन मध्ये वापरू शकतो.
- यू पी आय चा वापरताना तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते कारण , बँक अकाउंटचे माहिती न देता पैसे ट्रान्सफर करतात .
- तुमच्या UPI ID चा QR कोडे तयार करून शेअर करू शकता आणि दुसऱ्याचा QR कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकता.
- आर्थिक व्यवहार करताना अधिकचे कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाही
- आर्थिक व्यवहार 24/7 करता येतात
- बँक बॅलन्स चेक तुमच्या प्रोफाईल मध्ये जाऊन बघू शकता त्यासाठी बँकेत जायची गरज नाही
- ही पेमेंट सिस्टम भारत सरकारच्या देखरेखीखाली विकसित केली गेली त्यामुळे जास्त विश्वास ठेवू शकता
UPI ID कसा शोधायचा? | Find your UPI ID
- Phone Pe
- PhonePe अँप उघडा.
- वरच्या डाव्या कोपर्यात, तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
- “MY BHIM UPI ID” या ऑपशन वर क्लिक करा आणि तुम्हाला तुमचा UPI ID मिळेल. उदा. 9767xxxxxx@ybl
- Paytm
- पेटीएम अँप उघडा.
- होम पेज वर सर्वात वरच्या पट्टीवरील “BHIM UPI” भागावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचा UPI आयडी पेजच्या पहिल्या विभागात QR कोड च्या शेजारी मिळेल. UPI ID तुमचा रजिस्टर मोबाइल नंबर असतो. उदा. 9767xxxxxx@paytm
- BHIM
- BHIM अँप उघडा.
- होम पेज वर “प्रोफाइल” (Profile) वर क्लिक करा
- आता QR कोड खाली आणि UPI ID भागात तुमचा UPI ID असेल. तो साधारण तुमच्या रजिस्टर मोबाईल असतो. उदा. 9767xxxxxx@upi
- GPay
- GPay अँप उघडा.
- वरच्या डाव्या कोपर्यात, तुमच्या प्रोफाइल चित्रावर क्लिक करा.
- नंतर “Bank accounts” वर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या बँक खात्याचा UPI आयडी पाहायचा आहे त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला त्या बँक खात्याशी संबंधित सर्व UPI आयडी “UPI IDs” भागात सापडतील. उदा. 9767xxxxxx@oksbil
मी माझा यूपीआय पिन विसरलो आहे, तो मला कसा रीसेट करू ? | How to reset UPI Pin ?
- जर तुम्ही तुमचा यूपीआय पिन विसरला असाल तर forgot pin ओपशन वर क्लिक करा.
- नंतर डेबिटचे शेवटचे 6 अंक व समाप्ती तारीख टाईप करा.
- OTP टाकून नवीन यूपीआय पिन तयार करण्यासाठीचे पेज ओपन होईल,
- त्यामध्ये दोन वेळा नवीन पिन टाका. आणि अश्याप्रकारे तुमचा पिन रीसेट होईल .
UPI सुविधा देणारे App कोणते ? |UPI Apps
- BHIM UPI App
- PhonePe
- Paytm
- Google Pay
- Amazon Pay
- Airtel Pay इत्यादी .
UPI व्यवहाराची मर्यादा किती ? | UPI transitions limit
NPCI नुसार UPI व्दारे दररोज 1 लाख रुपयांचा व्यवहार करता येतो. परंतु, बिल पेमेंट आणि व्यापाऱ्यांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे.
तर बँकिंग व्यवहार करताना रक्कम हस्तांतरीत (Money Transfer) करण्यासाठी मर्यादा आहे. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत 25,000 ते 1 लाख रुपयांची रक्कम हस्तांतरीत करता येते. काही बँकांनी दैनंदिन ऐवजी आठवड्याची आणि महिन्याची मर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार, एचडीएफसी महिन्याकाठी 30 लाख रुपये हस्तांतरणाची परवानगी देते. HDFC UPI limit ,